पुणे

विजय वडेट्टीवार

CD

अमेरिकेशी व्यापार करार
शेतकऱ्यांच्या मुळावर येणारा
वडेट्टीवार ः सात मार्चला यवतमाळ येथे काँग्रेसचे आंदोलन
सकाळ वृत्तसेवा
नागपूर, ता. २१ : भारत आणि अमेरिका यांच्यातील नव्या व्यापार कराराने भारतातील शेतकऱ्यांचे नुकसान होणार आहे. महाराष्ट्रातील मका, सोयाबीन, कापूस उत्पादक शेतकऱ्यांना याचा फटका बसणार असल्याने याविरोधात काँग्रेस सात मार्च रोजी आंदोलन करणार असल्याची माहिती काँग्रेसचे विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी माध्यमांशी बोलताना दिली.
दिल्लीत काल करारामुळे शेतकऱ्यांवर होणारे परिणामावर चर्चा झाली. अमेरिकेतून येणाऱ्या मालावर शून्य टक्के कर तर भारतातून निर्यात होणाऱ्या मालावर १० टक्के कर आकारला जाणार आहे. यामुळे महाराष्ट्रातील कापूस, मका, तूर आणि सोयाबीन उत्पादक शेतकरी पूर्णपणे उद्ध्वस्त होईल. सध्या कापूस ४ हजार ५०० रुपये दराने विकला जात आहे तर मक्याला केवळ १ हजार ५०० रुपये भाव मिळत आहे. सोयाबीनचे भाव कोसळले आहेत. मात्र, सरकारला शेतकऱ्यांच्या प्रश्नांपेक्षा ‘शक्तिपीठ’ महामार्गासाठी जमिनी घेण्यात जास्त रस आहे. दिल्लीत पक्षश्रेष्ठींशी झालेली बैठक व्यापार करार आणि आंदोलनाची रूपरेषा ठरवण्यासाठी होती. त्यात कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही, असाही दावा त्यांनी केला.
राहुल दबावाला घाबरणारे नाहीत
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी आज भिवंडी न्यायालयातील उपस्थित होते. राहुल गांधी कोणत्याही दबावाला वा खटल्यांना घाबरणारे नाहीत. उलट पंतप्रधान नरेंद्र मोदींनाच राहुल यांची भीती वाटते हे वारंवार सिद्ध झाले आहे. सत्यासाठी लढणाऱ्या माणसाला अशा कारवायांनी रोखता येत नाही, असे वडेट्टीवार म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Son kills mother Sangli : बायकोसाठी मुलाने आईचा गळा दाबला, मृतदेहाशेजारीच रात्रभर झोपला अन्...; नंतर आई आईचा आक्रोश

Jal Jeevan Mission: राज्याचे ‘जलजीवन’ निधीच्या प्रतीक्षेत; २४ हजार योजनांची कामे ठप्प, केंद्राकडून केवळ साडेबारा कोटी मिळाले..

Latest Marathi News Live Update : IT कंपनीतील धर्मांतरप्रकरणी राष्ट्रीय महिला आयोगाची टीम आज नाशिकमध्ये येणार

Akola News: नुकसान भरपाईचा खेळखंडोबा; प्रीमियमच्या बदल्यात निराशा; पिक विमा योजना शेतकऱ्यांसाठी कागदोपत्रीच

America-Iran War: युद्ध थांबणार! अण्वस्त्रांसंबंधीची सर्वात मोठी अट इराणने केली मान्य; अमेरिकेचा दावा

SCROLL FOR NEXT