पुणे

अमेरिकेचा पाकिस्तानवर सुपर ओव्हरमध्ये विजय

CD

अमेरिकेचा पाकिस्तानवर सुपर ओव्हरमध्ये विजय
टेक्सास, ता. ७ ः ट्वेन्टी-२० विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेत सह यजमान अमेरिका संघाने स्पर्धेतला पहिला धक्कादायक आणि थरारक विजय मिळवला. माजी विजेत्या पाकिस्तानचा त्यांनी सुपरओव्हरमध्ये पराभव केला.
सुपर ओव्हरमध्ये अमेरिकेने प्रथम फलंदाजी करताना १८ धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल पाकला १३ धावाच करता आल्या. मुळ मुंबईकर आणि मराठी असलेल्या सौरव नैत्रावलकरने अमेरिका संघातून सुपर ओव्हरमध्ये १३ धावा देत एक फलंदाज बाद केला.
याच सुपरओवहरमध्ये फलंदाजीत अमेरिका संघातून अॅरॉन जोन्सने ११ धावा फटकावल्या होत्या.
तत्पूर्वी १६० धावांचा पाठलाग करताना अमेरिकेला कर्णधार मोनाक पटेल आणि अँड्रिस गस यांनी ४८ चेंडूत ६८ धावांची भागीदारी केली यात त्यांनी पाकच्या सर्वच प्रमुख आणि अनुभवी गोलंदाजांचा समाचार घेतला. अमेरिकेचा संघ विजयाच्या जवळ जात असताना मात्र ९ चेंडूच्या फरकाने हे जम बसलेले फलंदाज पाठोपाठ बाद झाले. त्यावेळी त्यांना ३७ चेंडूत ४९ धावांची गरज होती.
अँड्रिस गस आणि नितीश कुमार यांनी किल्ला लढवला, यात अखेरच्या चेंडूवर पाच धावांची गरज असताना नितीशने चौकार मारल्यामुळे सामना टाय झाला.
सौरव नैत्रावलकरने अमेरिका संघाला आश्वासक सुरुवात करुन दिली. पाकचा धडाकेबाज सलामीवीर मोहम्मद रिझवानला दुसऱ्याच षटकात बाद केले त्यानंतर केंजिगे याने उस्मान खानला माघारी धाडल्यामुळे पाकची सुरुवात २ बाद १४ अशी झाली होती. फखर झमानही फार काही करु शकला नाही. त्यामुळे ३ बाद २६ अशा संकटात सापडलेल्या पाकचा डाव कर्णधार बाबर आझम आणि शादाब खान यांनी अर्धशतकी भागीदारी करुन सावरला.

संक्षिप्त धावफलक
पाकिस्तान ः २० षटकांत ७ बाद १५९ (बाबर आझम ४४ - ४३ चेंडू, ३ चौकार, २ षटकार, शादाब खान ४० - २५ चेंडू, १ चौकार, ३ षटकार, इफ्तेकार अहमद १८, शाहिन शाह आफ्रिदी २३ - १६ चेंडू, १ चौकार, २ षटकार, नस्थूषा केंजिगे ४-०-३०-३, सौरव नेत्रावलकर ४-०-१८-२, अली खान ४-०-३०-१)
अमेरिका २० षटकांत ३ बाद १५९ (मोनाक पटेल ५० - ३८ चेंडू, ७ चौकार, १ षटकार, अँड्रिस गस ३५ - २६ चेंडू, ५ चौकार, १ षटकार, अॅरॉन जोन्स ३६ - २६ चेंडू, २ चौकार, २ षटकार, नितीश कुमार १४ - १४ चेंडू, १ चौकार, मोहम्मद आमीर ४-०-२५-१, नसीम शाह ४-०-२६-१)
------------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Administrative Reshuffle : प्रशासनात मोठा भूकंप! १५ IAS अधिकाऱ्यांसह ३८ बड्या अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या; पाहा कोणाची कुठे झाली रवानगी?

IND vs WI, 3rd ODI: केएल राहुलचं क्लासिकल शतक! रोहित-ऋतुराजची अर्धशतकं; भारताने वेस्ट इंडिजसमोर उभा केला धावांचा डोंगर

Asian Games 2026: हॉकीत भारतच आशियाचा राजा! महिलांनंतर पुरुष संघानेही जिंकलं गोल्ड मेडल; ऑलिम्पिक तिकीटही पक्के

Latest Marathi News Live Update : गांधी जयंतीपासून रोजगार सेवकाचे कामबंद आंदोलन

Pune Teachers MLC election : महायुतीचे विधान परिषद जागावाटप निश्चित; हायव्होल्टेज पुणे शिक्षक मतदारसंघ भाजपच्या वाट्याला; मंगेश चिवटे बंडखोरी करणार

SCROLL FOR NEXT