Biker
Biker 
पुणे

अल्पवयीनांकडून दुचाकींचा वापर

सकाळ वृत्तसेवा

पिंपरी - शिकवणी व महाविद्यालयात ये-जा करण्यासाठी अनेक अल्पवयीन मुले सर्रासपणे दुचाकींचा बेकायदा वापर करीत आहेत. त्याकडे वाहतूक पोलिसांनी दुर्लक्ष केले असून, ठोस कारवाईअभावी दिवसेंदिवस या प्रकारांत वाढ होत आहे.

शहरात विविध सुमारे ७० ते ७५ कनिष्ठ महाविद्यालये आहेत. या महाविद्यालयांमध्ये सुमारे एक लाखांहून अधिक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. अकरावीत प्रवेश घेतल्यावर महाविद्यालयात येण्यासाठी अनेक मुले ही दुचाकी व मोटारींचा वापर करतात. 

चुकीच्या पद्धतीने दुचाकी चालविल्याने अनेकदा त्यांना अपघाताला सामोरे जावे लागते. मात्र, याबाबत उप-प्रादेशिक परिवहन कार्यालय व वाहतूक पोलिसांकडून संबंधितांविरुद्ध कोणतीही ठोस कारवाई होत नाही.

असा आहे कायदा
मोटारवाहन कायद्यानुसार ज्या मुलाचे वय अठरापेक्षा कमी असेल, त्याला केवळ ५० सीसी क्षमतेपेक्षा कमी क्षमतेची दुचाकी चालविण्याचा परवाना देण्यात येतो. त्यासाठी संबंधित मुलाला व मुलीला त्यांच्या पालकांची लेखी परवानगी आणणे आवश्‍यक असते.

महाविद्यालयांची भूमिका
महाविद्यालये अल्पवयीन मुलांची जबाबदारी घेण्यास नकार देत असून, तशा आशयाचे प्रतिज्ञापत्र मुलांच्या पालकांकडून भरून घेत आहेत. मुलासंदर्भात काही दुर्घटना घडल्यास पालक म्हणून आम्ही महाविद्यालयावर कोणत्याही प्रकारचा दावा करणार नाही. तसेच, अशा घटनेत वाहनाचे काही नुकसान झाल्यास त्याला महाविद्यालय जबाबदार राहणार नाही. या सर्वांसाठी पालक म्हणून आमची जबाबदारी राहील, अशा आशयाचे प्रतिज्ञापत्र दिले जात आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'7 दिवस पत्नी अन् 7 दिवस प्रेयसीसोबत राहतो'; कराराच्या आधारे कोर्टाने केली आरोपीची सुटका

Sanju Samson Fined : अंपायरशी वाद घालणे आले अंगलट... BCCI ची संजू सॅमसनवर मोठी कारवाई; काय आहे संपूर्ण प्रकरण

Kolhapur Lok Sabha : मुश्रीफांच्या सांगण्यावरून कारवाई करत असाल तर मीही छत्रपतीये, याद राखा; संभाजीराजेंचा कोणाला इशारा?

Latest Marathi News Live Update : अमित शहा यांची आज जालन्यात सभा

Share Market Opening: गुंतवणूकदार चिंतेत! शेअर बाजारात पुन्हा घसरण; 'या' शेअर्सचे मोठे नुकसान

SCROLL FOR NEXT