soap 
पुणे

मास्क, सॅनिटायझरऐवजी रुमाल, साबणच वापरा

सकाळवृत्तसेवा

पुणे - ‘‘मास्क वापरण्यापेक्षा आपल्याकडील हातरुमाल हाच अधिक सुरक्षित आहे; तर किटाणूंपासून बचावासाठी सॅनिटायझर वापरण्यापेक्षा साबणानेच हात धुणे सर्वाधिक फायदेशीर आहे,’’ असे विभागीय आयुक्त दीपक म्हैसेकर आणि पुणे महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी सांगितले.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शहरात मास्क व सॅनिटायझरला विनाकारण मोठी मागणी वाढली आहे. त्यातून काळाबाजार होऊ लागला आहे. या पार्श्‍वभूमीवर हे आवाहन म्हैसेकर आणि गायकवाड यांनी केले आहे. प्रत्येकाने मास्क वापरण्याची काहीच आवश्‍यकता नाही. मास्कपेक्षा स्वत:कडील रुमाल हाच सर्वोत्तम आहे. मास्कपेक्षा तो अधिक सुरक्षा देणारा आहे. सॅनिटायझरचा वापर सध्या वाढला असला, तरी यातून मिळणारी सुरक्षितता ही अल्पावधीच आहे. सॅनिटायझरचा प्रभाव हा वीस मिनिटांपेक्षा जास्त राहू शकत नाही. उलट साबणाने स्वच्छ हात धुतल्यास त्याचा फायदा अथवा सुरक्षितता तीन ते साडेतीन तास राहते. प्रत्येकाने तीन ते चार वेळा साबणाने हात धुणे हेच सर्वात उत्तम व सुरक्षित आहे, असेही त्यांनी सांगितले.

शाळांनीही सक्ती करू नये
पालकांनी विद्यार्थ्यांना मास्क व सॅनिटायझरसह शाळेत पाठवावे, असा आग्रह काही शाळांकडून धरला जात आहे. त्यावर आयुक्त शेखर गायकवाड म्हणाले, ‘‘ही सक्ती अतिशय चुकीची असून, त्याची काहीही आवश्‍यकता नाही. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी घेणे हे जरी जरुरी असले, तरी त्याकरिता मास्क व सॅनिटायझरची शाळांनी केलेली सक्ती योग्य नाही. तसे आदेश महापालिकेच्या शिक्षण विभागाकडून काढण्यात येतील.’’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MSP Hike: शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! 6 पिकांच्या MSPमध्ये वाढ; गहू, हरभऱ्याला आता किती भाव?

Kannad Ambadi Dam Water Crisis: अंबाडी धरणातील पाणीसाठा फक्त ८.९१ टक्के; जानेवारीनंतर कन्नड शहर व परिसरात तीव्र पाणीटंचाईची शक्यता

Gopichand Padalkar : गोपीचंद पडळकर सांगली जिल्हा बँकेच्या मैदानात; उमेदवारी अर्ज दाखल करताना ‘जयंत पाटलांचा बाप आला’च्या घोषणा

Latest Marathi News Live Update : उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीवर बोलावली तातडीची बैठक...

Gangapur Crime: गंगापूर-खुलताबादच्या शेतवस्त्यांवर चोरट्यांची दहशत; आमदार प्रशांत बंबांकडून रात्रीची गस्त वाढवण्याचे निर्देश

SCROLL FOR NEXT