use of sanskrit language in transactions ravindra sathe Sakal
पुणे

Sanskrit Language : संस्कृत भाषेचा हवा व्यवहारात वापर - रवींद्र साठे

रवींद्र साठे यांचे मत; वाग्विलासिनी संस्कृत संमेलन उत्साहात

सकाळ वृत्तसेवा

Pune News : ‘‘संस्कृत भाषा जीवनमूल्ये शिकविते. समाज जोडण्याची संवेदना संस्कृत भाषेत असून ती आपल्या मनात आली पाहिजे. संस्कृत भाषेचा प्रचार-प्रसार करण्यासाठी ती व्यवहारात वापरली गेली पाहिजे. त्यासाठी मोठी चळवळ उभी करण्यासाठी आपण सर्वांनी पुढाकार घेतला पाहिजे’’, असे मत खादी ग्रामोद्योग कमिशनचे अध्यक्ष रवींद्र साठे यांनी रविवारी व्यक्‍त केले.

संस्कृत भारती पश्चिम महाराष्ट्र प्रांत, पुणे महानगर सिंहगड जनपद आणि शिक्षण प्रसारक मंडळ यांच्यातर्फे आयोजित एक दिवसीय वाग्विलासिनी संस्कृत संमेलनाच्या उद्‍घाटन सोहळ्यात ते बोलत होते. संमेलनाचे उद्‍घाटन बुलडाणा अर्बन को. ऑप. क्रेडिट सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिरीष देशपांडे यांच्या हस्ते झाले.

याप्रसंगी संमेलनाचे अध्यक्ष व संस्कृतभारतीचे पश्चिम महाराष्ट्र प्रांतमंत्री विनय दुनाखे, स. प. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुनील गायकवाड, शिक्षण प्रसारक मंडळीच्या नियामक मंडळाचे सदस्य सुधीर काळकर, संस्कृतभारतीचे अखिल भारतीय संपर्क प्रमुख श्रीश देवपुजारी, संमेलनाच्या संयोजिका वैखरी कुलकर्णी आदी उपस्थित होते.

शिरीष देशपांडे म्हणाले, ‘‘दैनंदिन जीवन व्यवहारात आपले भाषाप्रेम कृतीतून व्यक्‍त झाले पाहिजे. भाषा प्रेमाच्या जोडीला संवेदनशीलता असेल तर माणसे जोडण्याचे कामही त्यातून होईल. संस्कृत भाषेला मोठे वैभव असून ते पुन्हा प्राप्त करण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करायला हवेत.’’

दुनाखे म्हणाले, ‘‘संस्कृतभारती गेल्या ४२ वर्षांपासून संस्कृतचा प्रचार-प्रसार करण्यासाठी विविध उपक्रम राबविते. त्यामध्ये शिबिर, परिसंवाद, चर्चासत्रे, संस्कृतवर्ग यासह विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेण्यात येतात. संस्कृत ही जनभाषा व्हावी, यासाठी प्रयत्न केला जात असून सर्वांनी चळवळीत सहभागी व्हावे.’’

या संमेलनात आयुर्वेद, संगणकाद्वारे भाषा विश्लेषण, भारतीय गणित आणि संस्कृत या विषयावर परिसंवाद झाला. वाईच्या किसान वीर महाविद्यालयाच्या माजी प्राध्यापिका अंजली पर्वते यांनी परिसंवादाचे अध्यक्षस्थान भूषविले, तर वैद्य अनंत पाटील, प्रांजली देशपांडे, रमा क्षीरसागर, श्रेया लोणीकर यांनी त्यात सहभाग घेतला. विद्यार्थ्यांनी विविध गुणदर्शन व संस्कृत गीतरामायण सादर केले. संमेलनाच्या समारोपप्रसंगी ज्येष्ठ लेखक संजय उपाध्ये तसेच रामचंद्र शिधये उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Satara District Bank: सातारा जिल्हा बँक निवडणुकीआधी राजकीय खलबतं; सुनेत्रा पवार-उंडाळकरांची ‘कमरा बंद’ चर्चा चर्चेत

World Athletics U20 Championships: वर्ल्ड अंडर-२० ॲथ्लेटिक्समध्ये भारताचा डंका; आशिष यादवला रौप्य, तर शाहनवाज खानने जिंकले कांस्य पदक!

Shakeel Noorani: ३३ वर्षीय अभिनेत्रीला घरी बोलावून अत्याचार, ७३ वर्षांच्या दिग्दर्शकावर गंभीर आरोप; सिनेसृष्टीत खळबळ

Marathi News Live Updates : पुण्यात सोसायटीत खेळणाऱ्या चिमुकलीला कारने चिरडलं, घटना CCTVत कैद

Nashik Leopard News: बिबट्या पोहोचला शाळेच्या मैदानात, सीसीटीव्हीत कैद; पिंजरा लावण्याची मागणी

SCROLL FOR NEXT