पुणे

मुकबधीर कोरोनाबाधितांशी संवाद सोपा होण्यासाठी उपयुक्त चित्रफीत

शीतल बर्गे

बालेवाडी (Pune) : पुण्यातील एकांश ट्रस्ट ही दिव्यांग व्यक्तींना सक्षम बनविण्यासाठी 2009 पासून कार्य करत आहे. सध्या कोरोनाच्या या भीषण परिस्थितीत रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. मूकबधीर व्यक्तींना जर कोरोना झाला तर त्यांना उपचार करताना डॉक्टर तसेच आरोग्य कर्मचाऱ्यांना अनेक अडचणी येतात याचा विचार करून या ट्रस्टकडून कोरोनाशी संबंधित कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन होईल अशी चित्रफीत बनविण्यात आली असून संकेत भाषेविषयी ही मार्गदर्शन केले आहे.

सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने सर्वत्र हाहाकार माजवला आहे. अशा परिस्थितीत राज्य सरकारकडून 'ब्रेक द चेन' ची नियमावली जाहीर केली आहे. त्यानुसार सर्वत्र लॉक डाऊनही करण्यात आले आहे. 18 वर्षावरील सर्वांना लसीकरणा सुरू करण्यात आले आहे. असे असताना आपल्या समाजातील एक घटक दुर्लक्षितच राहिला आहे तो म्हणजे 'मुकबधीर व्यक्ती'. या व्यक्तींना जर कोरोनाची लागण झाली तर काय करावे? त्यांच्याशी संपर्क कसा साधायचा? ही अवघड बाब असते.

हे लक्षात घेऊन पुणे शहरातील एकांश ट्रस्टच्या व्यवस्थापकीय विश्‍वस्त आणि संस्थापक अनिता अय्यर नारायण यांनी विशेष प्रयत्न करून डॉक्टर किंवा कोरोनाशी संबंधित काम करणाऱ्या इतर कर्मचाऱ्यांसाठी एक चित्रफीत तयार केली असून त्याद्वारे कोरोना कसा फैलावतो? त्याचे प्रतिबंधात्मक उपाय कोणते? कोणती काळजी घ्यायची? हेही चिन्हाच्या भाषेत रुग्णांना कसे समजावून सांगायचे याचीही माहिती दिली आहे. त्याच बरोबर रुग्णांना ज्यावेळी व्हेंटिलेटर लावतात त्या वेळी ते बोलू शकत नाही अशा वेळी समोर जर सांकेतिक भाषेतील भित्ती पत्रक लावली तर हे रुग्ण त्यांना जे सांगायचे आहे, ते डॉक्टरांना किंवा आरोग्य सेविकांना खुणांच्या आधारे सांगू शकतात. अशी संपूर्ण माहिती या चित्रफितीत दिली आहे. या चित्रफितीमुळे डॉक्टरांना तसेच इतर कोरोनाशी संबंधित कर्मचाऱ्यांना मुकबधिर रुग्णाचा उपचारासाठी नक्कीच मदत होणार आहे. हे उपचार करत असताना चिन्हाच्या भाषेविषयी किंवा मूकबधिरांशी संपर्क साधताना काही अडचणी येत असतील तर info@ekansh.org या संकेत स्थळावर संपर्क करून मदत मिळवता येईल अशी माहिती एकांश ट्रस्टच्या अनिता अय्यर नारायण यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT