Using Ayurvedic ingredients per the standards of medicine modern has been developed on Corona
Using Ayurvedic ingredients per the standards of medicine modern has been developed on Corona  
पुणे

कोरोनावर आयुर्वेदाची मात्रा; पुण्यातील वैद्यकीय तज्ज्ञांचे नेचर ट्रायलमध्ये रिसर्च पेपर प्रसिद्ध

सकाळवृत्तसेवा

पुणे: आयुर्वेदिक घटक वापरून आधुनिक वैद्यकशास्त्राच्या निकषावर पुरेपूर उतरलेले कोरोनाचे गुणकारी औषध पुण्यात विकसित झाले आहे. कोरोना उपचाराची सविस्तर शास्त्रीय माहिती नेचर्स ट्रायल जर्नल या नियतकालिकात प्रसिद्ध झाली असून, आयुर्वेदिक प्रोटोकॉलबाबतचा शोधनिबंध प्रसिद्ध होण्याची ही पहिली वेळ आहे.

कोरोनाच्या उपचारासाठी रामबाण औषध मिळाले नाही. या पार्श्वभूमीवर भारतातील प्राचीन वैद्यकशास्त्र असलेल्या आयुर्वेदाच्या मदतीने गुणकारी औषध आणि त्याच्या कोरोना उपचाराची दिशा निश्‍चित करण्यात पुण्यातील वैद्यकीय तज्ज्ञांना यश आले आहे. या संशोधनाला सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या जर्नल कमिटीने देखील पुष्टी दिली असल्याची माहिती प्रा. सुरेश पाटणकर यांनी दिली.

हे ही वाचा : वालचंदनगर कंपनीने केली बुस्टरची निर्मिती; चाचणी करणारी देशातील एकमेव कंपनी

ते म्हणाले, "एएमएआय ट्रस्ट व एस हॉस्पिटल यांनी हे कोरोना उपचाराची नेमकी दिशा निश्‍चित करण्याचे आव्हान स्वीकारले. या प्रोटोकॉलमध्ये आंतरराष्ट्रीयदृष्ट्या स्वीकारले जाऊ शकतील, असे चाचणी निकष आहेत. यामध्ये व्हायरल लोडची चाचणी (ज्यामध्ये प्रत्येक बाधित व्यक्तीचा नेमका व्हायरल काउंट मोजला जातो), टी-सेल (टी एच-1, टी एच-2, टी एच-17), डी-डायमर, बी-लिम्फोसाइट्‌स, आयएलएस-6, आयजीजी, एनकेसेल इत्यादींचा समावेश आहे. नेचर्स ट्रायल जर्नलमध्ये कोरोनाबाबत आयुष प्रोटोकॉल प्रकाशित होणे ही अभिमानाची गोष्ट आहे.आयुर्वेदामध्ये संशोधन करताना आधुनिक चाचणी निकष असण्याची आवश्‍यकता यामुळे अधोरेखित होते.'

वैद्य ऋषीकेश रांगणेकर, डॉ. किशोर सूर्यवंशी, डॉ. प्रवीण सोनी, डॉ. कल्पना जोशी आणि डॉ. तेजस शहा यांचा समावेश होता. या टीमने कोरोना रुग्णांच्या उपचारावरील संशोधनासाठी क्‍लिनिकल ट्रायल प्रोटोकॉल तयार केले.

हे ही वाचा : गेली अनेक वर्षे माडगूळकर कुटुंबीय गदिमांच्या स्मारकासाठी प्रयत्न करीत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shah Fake Video Case : झारखंड काँग्रेसचं एक्स अकाऊंट सस्पेंड; अमित शाह व्हिडीओ प्रकरणात मोठी कारवाई

Google Error : गुगल डाऊन! जगभरातील युजर्स त्रस्त; अमेरिकेतून 1400 तक्रारी

Yogi Adityanath : काँग्रेस सत्तेत आल्यास हिंदूंची विभागणी होईल - योगी आदित्यनाथ

IPL 2024, CSK vs PBKS: चेन्नईला पंजाबच्या गोलंदाजांनी रोखलं अन् फलंदाजांनी ठोकलं; ऋतुराजसेनेचा बालेकिल्ल्यात दुसरा पराभव

Loksabha election 2024 : जेडीयूचे माजी प्रदेशाध्यक्ष शशांक राव यांचा भाजपात प्रवेश; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती

SCROLL FOR NEXT