ऊसतोड कामगार  sakal
पुणे

ऊसतोड कामगार महामंडळाला अखेर मूर्त स्वरूप

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पुण्यात राज्यस्तरीय कार्यालयाचे रविवारी उद्घाटन

सकाळ वृत्तसेवा

पुणे : अनेक वर्षे कागदावर राहिलेल्या ‘लोकनेते गोपीनाथराव मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळा’ला अखेर मूर्त स्वरूप प्राप्त झाले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते रविवारी (ता. ३) हे महामंडळ कार्यान्वित करून पुण्यातील राज्यस्तरीय कार्यालयाचे उद्घाटन करण्यात येणार आहे.

येथील येरवडा परिसरातील सामाजिक न्याय भवनाच्या आवारात हे कार्यालय उभारले आहे. रविवारी सायंकाळी सहा वाजता लोकार्पण सोहळा सामाजिक न्याय भवन, येरवडा येथे मुख्यमंत्री ठाकरे यांच्या हस्ते पार पडणार आहे. या कार्यक्रमास उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, सहकार मंत्री बाळासाहेब पाटील, सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे, विधान परिषदेच्या उपाध्यक्षा डॉ. नीलम गोऱ्हे आदी उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमात ऊसतोड कामगारांची नोंदणी केलेल्या कामगारांना प्रातिनिधिक स्वरूपात ओळखपत्र दिले जाणार आहेत. या वेळी ऊसतोड कामगार व वाहतूक संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित राहणार असल्याची माहिती समाज कल्याण आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे यांनी दिली.

‘लोकनेते गोपीनाथराव मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळा’ला मूर्त स्वरूप येत आहे. पाडव्याच्या दुसऱ्या दिवसापासून ऊसतोड कामगारांच्या कल्याणाची नवी गुढी राज्य सरकारच्या माध्यमातून उभारत आहोत, याचा आनंद शब्दांत व्यक्त करता येणार नाही. हा दिवस माझ्यासाठी ऐतिहासिक आहे.

- धनंजय मुंडे, सामाजिक न्याय मंत्री

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

West Bengal Result: बंगाल निकालाचा 'महासंग्राम'! इतिहास घडणार की परंपरा कायम राहणार? हे ‘गेमचेंजर’ फॅक्टर्स निकाल ठरवणार

‘तुमचे पैसे पडले... म्हणत चार लाखांवर डल्ला! बँकेबाहेरच शेतकर्‍याची फसवणूक; 'एचडीएफसी'समोर दिवसाढवळ्या थरार...

GT vs PBKS: ४७ वर ५ विकेट्स, मग सुर्यांश शेडगे ठरला पंजाबसाठी संकटमोचक; गुजरातच्या वेगवान माऱ्यासमोर श्रेयस अय्यरचे शिलेदार ढेपाळले

खोटं बोलून नदी किनारी नेलं; नंतर जावयानं सासूला क्रूरपणे संपवलं, संतापजनक कारण समोर

Velhe Nasrapur Protest: नसरापूर अत्याचार प्रकरणाचा राजगड तालुक्यात तीव्र पडसाद; वेल्हे-पानशेतसह परिसर कडकडीत बंद

SCROLL FOR NEXT