पुणे

परिंचेमध्ये उत्सव सावित्रीच्या लेकींचा कार्यक्रम

CD

परिंचे, ता. ८ : महिला सर्वांगीण उत्कर्ष मंडळ (मासूम) व एस. एम. जोशी सोशालिस्ट फाऊंडेशन यांच्या वतीने आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे औचित्य साधून ‘उत्सव सावित्रीच्या लेकींचा’ हा कार्यक्रम घेण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्ष मासूम संस्थेच्या संस्थापक विश्‍वस्त मनीषा गुप्ते होत्या. तर प्रमुख वक्ते म्हणून शीतल यशोधरा उपस्थित होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून परिंचे गावच्या सरपंच पुष्पलता नाईकनवरे, पंचायत समिती सदस्य सायली शिंदे, एस. एम. जोशी सोशालिस्ट फाउंडेशनचे कार्यवाह उपेंद्र टण्णु, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते पी. एस. जाधव, सटलवाडी गावाचे माजी सरपंच गोपाळदादा कदम, मासूम संस्थेच्या सहसंयोजक जयश्री नलगे, सेवा निवृत्त पोलिस अधिकारी पी. सी. जाधव उपस्थित होते.
यावेळी यशोधरा म्हणाल्या, ‘संविधान प्रत्येकाने समजून घेणे आवश्यक असून आपल्याला दिलेले हक्क आणि अधिकार तसेच विविध कायदे समजून घेऊन कृतिशील होण्याची गरज आहे.’’
‘‘ज्या ज्या ठिकाणी महिलांचा सन्मान होतो तेथेच गावाची व देशाची प्रगती होते. महिलांच्या आरोग्याची आणि सुरक्षिततेची आपण सर्वांनी काळजी घेतली पाहिजे.’’ असे मत परिंचे गावचे सामाजिक कार्यकर्ते पांडुरंग जाधव यांनी व्यक्त केले.’’
मनीषा गुप्ते म्हणाल्या, ‘‘जाती-धर्म-लिंगाच्या चौकटीतून बाहेर येऊन माणूस म्हणून सन्मानाने जगण्याची गरज आहे.’’
कार्यक्रमात आदिवासी गावातील माजी सरपंच छबूताई ढगारे, मांढर गावातील राजश्री शिर्के, प्रमिला सुकल, छबूताई शिंदे या विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या महिलांचा सन्मान करण्यात आला. यावेळी विवेक युवा मंचच्या कार्यकर्त्यांनी ‘संविधान आणि महिला’ या विषयावर पथनाट्य सादर केले. प्रास्ताविक जयश्री नलगे यांनी केले. तर आभार प्रदर्शन मीना शेंडकर यांनी मानले. सूत्रसंचालन वनिता पापळ यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी श्रीकांत लक्ष्मी शंकर, माया गुरव, पुष्पा जाधव, सचिन गोंधळी, राहुल भोसले आणि मासूमच्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MS Dhoni Post: 'कोच साहेब, चेहऱ्यावर हसू...' धोनीचा गौतम गंभीरसाठी T20 WC विजयानंतर स्पेशल संदेश; बुमराहलाही म्हटलंय चॅम्पियन

T20 World Cup 2026: गौतम गंभीरने जेतेपदाची ट्रॉफी ३ जणांना केली समर्पित; पहिले नाव राहुल द्रविडचे, अन्य दोघंही तितकेच महत्त्वाचे

T20 World Cup Final: सचिन, विराटपासून PM मोदींपर्यंत... जगज्जेत्या टीम इंडियावर कौतुकाचा वर्षाव; पाहा कोण काय म्हणालंय

T20 World Cup: सूर्यकुमार यादवने अहमदाबादमध्ये ट्रॉफी उंचावली अन् इथे मुंबईत सचिन तेंडुलकरच्या घराबाहेर बघा काय घडले? मास्टर बास्टरने पोस्ट केला Video

Sanju Samson: टी-२० वर्ल्ड कपच्या टूर्नामेंटमध्ये ३२१ धावा; ‘प्लेअर ऑफ द सिरीज’… तरीही संजू सॅमसनला एक पैसाही नाही! कारण काय?

SCROLL FOR NEXT