पुणे

उत्तराखंडमधील टिहरीमध्ये भीषण अपघातात नऊ ठार

CD

न्यू टिहरी/ऋषिकेश, ता. १७ (पीटीआय) : उत्तराखंडमधील टिहरी गढवाल जिल्ह्यात मंगळवारी पहाटे प्रवाशांनी भरलेली बस लोखंडी संरक्षक कठडा तोडून खोल दरीत कोसळली. गुलर पुलापासून सुमारे १०० मीटर खाली असलेल्या दरीत ही बस कोसळून गुलर गड नदीत पडली. या भीषण अपघातात नऊ जणांचा मृत्यू झाला असून २५ जण जखमी झाले आहेत. बसमध्ये एकूण ३४ प्रवासी होते, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही बस ३४ प्रवाशांना घेऊन पहाटे ३.१५ वाजता हरिद्वारहून निघाली होती. पहाटे ४.५० वाजण्याच्या सुमारास गुलर पुलाजवळ ही बस अचानक नदीत कोसळली. ही बस हरिद्वारहून जोशीमठाकडे जात होती.
या दुर्घटनेबद्दल मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी यांनी तीव्र दुःख व्यक्त केले. जखमींना योग्य वैद्यकीय उपचार मिळावेत, तसेच अपघातग्रस्त आणि त्यांच्या कुटुंबीयांना सर्वतोपरी मदत करावी, असे निर्देश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले. जखमी लवकर बरे व्हावेत, अशी सदिच्छाही त्यांनी व्यक्त केली.
उत्तराखंडचे राज्यपाल धाल सिंह बिसेन यांनीही टिहरी गढवाल आणि रुद्रप्रयाग जिल्ह्यातील उखीमठ परिसरात झालेल्या रस्ते अपघातांतील जीवितहानीबद्दल दुःख व्यक्त केले. मृतांना श्रद्धांजली अर्पण करून त्यांच्या कुटुंबीयांप्रति संवेदना व्यक्त केल्या. तसेच जखमींच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी, अशी प्रार्थना केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

यष्टिंमागचा 'योद्धा'; जो सामन्याला द्यायचा सहज कलाटणी, नाव सांगायची गरज नाही...

Cyclone Akvan Update: 145 किमी प्रतितास वेगाने धडकणार चक्रीवादळ ‘अकवान’; 'या' 13 जिल्ह्यांमध्ये पावसाचा अंदाज

IPL 2027: शमी चा संघ बदलला! लखनौ-राजस्थान मध्ये मोठी ट्रेड, कोणासोबत झाली अदला बदली

MS Dhoni Retire: महेंद्रसिंग धोनीने त्याचा निवृत्तीचा निर्णय CSK ला केव्हा आणि कसा कळवला? म्हणाला, माझं नाव त्यात लिहा...

School Admission: मोठी बातमी! नर्सरी-केजी प्रवेशावेळी डोनेशन मागितल्यास शाळांवर कारवाई; मुलाखती अन् चाचण्याही बंद; वाचा नवे नियम

SCROLL FOR NEXT