Corona Vaccination Sakal
पुणे

पुणे महापालिकेचे लसीकरण आज बंद

शासनाकडून महापालिकेला (सोमवारी) कोरोना प्रतिबंधक लस उपलब्ध होऊ शकलेली नाही. त्यामुळे आज (मंगळवारी) महापालिकेच्या केंद्रांवरील लसीकरण बंद

सकाळ वृत्तसेवा

पुणे - शासनाकडून महापालिकेला (Municipal) (सोमवारी) कोरोना प्रतिबंधक लस (Corona Preventive Vaccine) उपलब्ध होऊ शकलेली नाही. त्यामुळे आज (मंगळवारी) (Tuesday) महापालिकेच्या केंद्रांवरील लसीकरण बंद (Close) असणार असल्याचे महापौर मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol) यांनी सांगितले. (Vaccination Close in Pune on Tomorrow Tuesday)

शहरात महापालिकेतर्फे ४५ च्या पुढील वयोगटातील नागरिकांचे प्राधान्याने लसीकरण सुरू आहे. शासनाकडून शनिवारी १३ हजार डोस उपलब्ध झाले होते, त्यानुसार गेल्या दोन दिवसांपासून लसीकरण सुरू होते. सध्या महापालिकेकडे मोजके डोस उपलब्ध आहेत, त्यातून लसीकरण करणे शक्य नसल्याने मंगळवारचे लसीकरण बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. मंगळवारी लस उपलब्ध झाल्यास लसीकरणाचे पुढील नियोजन जाहीर केले जाणार आहे.

दरम्यान सोमवारी शहरामध्ये ७ हजार १६७ जणांचे लसीकरण झाले आहे. त्यामध्ये आरोग्य कर्मचाऱ्यांचा पहिला डोस ८७, दुसरा डोस १८, फ्रंट लाईन कर्मचारी पहिला डोस ३८१, दुसरा डोस ३३, ज्येष्ठ नागरिकांचा पहिला डोस १ हजार ५४२, दुसरा डोस ७, ४५ ते ५९ वयोगटात पहिला डोस ३ हजार ३३९, दुसरा डोस १४ आणि १८ ते ४४ वयोगटातील १ हजार ७४६ जणांना पहिला डोस देण्यात आला आहे. १६ जानेवारी ते २४ मे या कालावधीत ९ लाख ६६ हजार ५४३ जणांना लस देण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT