पुणे

पुण्यात खासगी हॉस्पिटल्समध्ये 18 ते 44 वयोगटासाठी लवकरच मिळणार लस

विनायक होगाडे

पुणे : पुण्यात लशींचा तुटवडा असल्यामुळे राज्य सरकारनं 18 ते 44 वर्ष वयोगटातील नागरिकांचं लसीकरण (Vaccination) स्थगित केलं आहे. पण 18 ते 44 वर्ष वयोगटातील नागरिकांसाठी पुण्यात लवकरच लस उपलब्ध होणार आहे. पण ही लस पुण्यातील फक्त काही खासगी रुग्णालयातच उपलब्ध असणार आहे. आज गुरुवारी पुण्यातील खासगी रुग्णालयात (private hospitals in Pune) लस पोहचण्याची शक्यता आहे. पुढील आठवड्यापासून 18 ते 44 वर्ष वयोगटातील नागरिकांसाठी लसीकरण सुरुवात होणार आहे. रुबी हॉल क्लिनिक, नोबेल हॉस्पिटल, भारती हॉस्पिटल, दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल, सह्याद्री हॉस्पिटल आणि पूना हॉस्पिटलमध्ये पुढील आठवड्यापासून 18 ते 44 वयोगटातील नागरिकांना लस मिळणार आहे. राज्याचे आरोग्य सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी 'इंडियन एक्स्प्रेस'ला माहिती दिली. कोविन ऍपला नोंदणी असणाऱ्या 18 ते 44 वयोगटातील तसेच त्यापुढील वयाच्या नागरिकांना खासगी रुग्णालयात लसीकरणाला परवानगी देण्यात आल्याचं व्यास यांनी सांगितलं. मात्र, 18 ते 44 वयोगटातील शासकीय आरोग्य सेवांतील व्यक्तींचे लसीकरण केले जाणार नाही. (Vaccinations for 18 to 44 age group set to resume soon in private hospitals in Pune)

दरम्यान, खासगी रुग्णालयातील अधिकाऱ्यांनी मात्र 18 ते 44 वयोगटातील नागरिकांच्या लसीकरणाबाबत अद्याप स्पष्टता नसल्याचं सांगितलं आहे. पुण्यात लसीची पहिली खेप आज गुरुवारी मिळण्याची शक्यता आहे. रुबी हॉल क्लिनिक, नोबेल हॉस्पिटल, भारती हॉस्पिटल, दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल, सह्याद्री हॉस्पिटल आणि पूना हॉस्पिटल गुरवारपर्यंत लसीकरणाचे डोस कधीही उपलब्ध होतील अशी अपेक्षा करत आहेत. मात्र खासजी हॉस्पिटल्समधील अधिकाऱ्यांनी अद्याप 18 ते 44 गटातील लोकांच्या लसीकरणाबाबत स्पष्टता नसल्याचं सांगितलं आहे. खासगी हॉस्पिटल्सनी सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया आणि भारत बायोटेककडे पर्चेस ऑर्डर दिल्या होत्या आणि त्यानुसार आता डोसच्या बॅचेस मिळण्यास सुरवात झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Deccan Queen Heritage Coach : मुंबई-पुणे 'डेक्कन क्वीन' नव्या हेरिटेज लूकमध्ये; चहा, नाष्टा, डायनिंग ट्रेनचा अनुभव खतरनाक

Oman Coast Incident : ओमान किनाऱ्याजवळ व्यापारी जहाजावर मोठा हल्ला, १० भारतीयांना वाचवण्यात यश, एक जण बेपत्ता

'तू का आला नाहीस?' असं म्हणत न जन्मलेल्या बाळाला पत्रं लिहायच्या ओम पुरी यांच्या पहिल्या पत्नी, बसलेला मानसिक धक्का

Latest Marathi News Update : सिडकोच्या घराची प्रतीक्षा सोडतीची

Mumbai Pune Journey : कोण कोणाच्या गळाला लागणार? विश्वजित कदमांची भाजपसोबतची जवळीक पुन्हा चर्चेत; मुख्यमंत्र्यांसोबतच्या मुंबई ते पुणे प्रवासाने रंगल्या चर्चा

SCROLL FOR NEXT