पुणे

वाढवण बंदराविरोधातील २० तासांचा ''रास्ता रोको'' मागे; कोस्टल मार्ग खुला, मात्र आंदोलकांचा ठिय्या कायम

CD

वाढवण बंदराविरोधातील ‘रास्ता रोको’ मागे
कोस्टल मार्ग अखेर खुला; ठिय्या कायम
तारापूर (जि.पालघर), ता. १६ : प्रस्तावित वाढवण बंदराच्या विरोधात वरोर (ता. डहाणू) येथे सुरू असलेले रास्ता रोको आंदोलन अखेर २० तासांनंतर सोमवारी मागे घेण्यात आले. नागरिक आणि प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी आंदोलकांनी हा निर्णय घेतला. त्यामुळे बोर्डी, डहाणू आणि चिंचणी परिसरातील कोस्टल मार्गावरील वाहतूक पुन्हा सुरळीत झाली आहे; मात्र आंदोलकांनी रस्त्याच्या कडेला ठिय्या आंदोलन सुरूच ठेवले.
वाढवण बंदर युवा संघर्ष समिती, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष (सीपीएम), काँग्रेस, कष्टकरी संघटना आणि आदिवासी एकता परिषद यांसह विविध सामाजिक व राजकीय संघटनांनी एकत्र येत हे आंदोलन केले होते. आंदोलकांनी तब्बल २० तास कोस्टल मार्ग रोखून धरल्याने परिसरातील वाहतूक ठप्प झाली होती. परिस्थिती लक्षात घेऊन पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. तसेच वरोर येथे बॅरिकेड्स लावून मार्ग बंद करण्यात आला होता.दरम्यान, रास्ता रोको मागे घेण्याचा निर्णय जाहीर होताच पोलिसांनी बॅरिकेड्स हटवले आणि वाहतूक पूर्ववत केली. या आंदोलनात शेकडो स्थानिक भूमिपुत्र, मच्छीमार आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते.
बंदराविरोधातील लढा सुरूच
रास्ता रोको आंदोलन मागे घेतले असले, तरी वाढवण बंदराला असलेला विरोध कायम आहे. जोपर्यंत हा प्रकल्प पूर्णपणे रद्द होत नाही, तोपर्यंत रस्त्याच्या बाजूला ठिय्या आंदोलन सुरूच राहील. आगामी काळात हे आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशारा आंदोलकांच्या नेत्यांनी दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Price: हॉलमार्क असलेलं सोनं खरंच शुद्ध असतं का? CAG च्या अहवालाने उघड झाला सरकारी यंत्रणेचा ढिसाळपणा

Syed Mushtaq Ali Trophy: संजू सॅमसनची तुफानी फटकेबाजी अन् मग निधीशच्या ५ विकेट्स; महाराष्ट्राचा केरळकडून दारुण पराभव!

Professor Recruitment Issue : प्राध्यापक भरतीचा मुहूर्त कधी? नऊ महिन्यांपासून प्रक्रिया रखडली; नेट-सेट, पीएच.डी.धारकांचे पुण्यात बेमुदत धरणे आंदोलन

Water Cut Decision : वाढीव पाणी कपातीचा निर्णय लांबणीवर; पाटबंधारे विभागासोबतच्या निर्णयानंतर अंमलबजावणी

Pune News : वॉर्डन पुरविण्याची कोंडी सुटली; आयुक्तांनी स्थगिती उठवली

SCROLL FOR NEXT