पुणे

सकाळ संवाद

CD

वडगाव बुद्रुक, जाधवनगरमधील
रस्त्याची तातडीने दुरुस्ती करावी
वडगाव बुद्रुक, जाधवनगर परिसरातील सर्व मुख्य व अंतर्गत रस्ते अतिशय निकृष्ट दर्जाचे झाले असून, त्यावर जागोजागी खड्डे पडलेले आहेत. यामुळे वाहनांचे नुकसान होत आहे. परिसरातील कोणत्याही रस्त्याची पथविभागाने साधारण डागडुजीही केलेली नाही. या रस्त्याची खोदाई करून पाईपलाईन संबंधित कामे झाली, मात्र, त्यानंतर रस्ते पूर्ववत केलेले नाहीत. याउलट अधिकाऱ्यांनी अशाच निकृष्ट रस्त्यांवर सुरळीत वाहतुकीसाठी पांढऱ्या पट्ट्या मारून खुणा केल्या आहेत. महापालिकेने नागरिकांच्या सोयीसाठी तातडीने या रस्त्यांची दुरुस्ती करावी.
- एक नागरिक
------------------------------------
दत्तवाडीतील शाळेसमोरील
कचरा हटवून स्वच्छता करावी
दत्तवाडी परिसरातील महापालिका शाळा क्रमांक ३० ची दुरवस्था झाली आहे. जवळपास वर्षभरापासून शाळेच्या आवारात कचराकुंडी झाली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे. याबाबत महापालिकेकडे अनेकदा तक्रार करूनही त्याची दखल घेतली जात नाही. प्रशासनाने विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा विचार करून तरी, या समस्येकडे लक्ष द्यावे.
- विशाल काळे, दत्तवाडी (PNE26W20069)
-------------------------------------------
स्वप्नशिल्प सोसायटीसमोरील
पदपथ रिकामा करावा
गुळवणी महाराज पथ, कोथरूड येथील स्वप्नशिल्प सोसायटीसमोरील पदपथावर एका बांधकाम व्यावसायिकाकडून सिमेंटचे ब्लॉक ठेवण्यात आले आहेत. तसेच, महापालिकेने काही कामासाठी येथील मुख्य रहदारीचा सिमेंट काँक्रीटचा रस्ताही खोदून ठेवला आहे. त्यामुळे नागरिकांच्या दैनंदिन वाहतुकीस मोठा अडथळा निर्माण झाला असून ज्येष्ठ नागरिक, महिला, लहान मुले तसेच दुचाकीस्वारांच्या सुरक्षेला गंभीर धोका निर्माण झाला आहे. प्रशासनाने येथील काम तातडीने उरकून संबंधित बांधकाम व्यावसायिकावर कारवाई करावी.
- प्रशांत भोलागीर, कोथरूड (PNE26W20071)
----------------------------------------
कर्वे पुतळ्यादरम्यान असलेले
पथदिवे रात्रंदिवस सुरूच
कोथरूड-कर्वे रस्ता आणि कालवा रस्त्यावरील पौड फाटा ते कर्वे पुतळादरम्यान असलेले पथदिवे गेल्या आठ दिवसांपासून रात्रंदिवस चालू आहेत. यामुळे हजारो युनिट वीज वाया जात आहे. कडक उन्हाळ्यात विजेची मागणी वाढली आहे. काही ठिकाणी भारनियमन करावे लागते. अशावेळी विजेचा हा अपव्यय परवडणारा नाही. हे दिवे का चालू आहेत याचा खुलासा महापालिकेने करावा. तसेच दिवे चालू-बंद करण्याचे नियोजन करून वीज वाचवावी.
- शिवाजी पठारे, कोथरूड (PNE26W20072)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Metro Viral News: मुंबई मेट्रोत मांजरीला लागली 'नोकरी'! MMMOCL ने दिलं Chief Feline Officer पद, ड्युटीही ठरवली

Hospital Fire Audit : आरोग्य विभागाचे वरातीमागून घोडे; अमरावती दुर्घटनेनंतर राज्यातील रुग्णालयांचे फायर ऑडिट

Mehkar Hospital Negligence : मेहकरमध्ये रुग्णालयापासून अवघ्या ५० मीटरवर रस्त्यावर प्रसूती; आरोग्य कर्मचाऱ्यांची मदत नाकारल्याने संताप

Marathi News Live Updates : एका व्यावसायिक इमारतीत आग

IND vs SL: 'तू वेळ वाया घाववतोय ब्रो...', सर्फराज खानची श्रीलंकन कर्णधाराला स्लेजिंग, Video होतोय Viral

SCROLL FOR NEXT