In Vadgaon Sheri constituency 6 candidates are ineligible and 17 eligible for Maharashtra Vidhan Sabha 2019 
पुणे

Vidhan Sabha 2019 : वडगाव शेरी मतदारसंघात 6 जणांचे उमेदवारी अर्ज अपात्र; 17 जण पात्र 

सकाळ वृत्तसेवा

पुणे : आमदार होण्यासाठी निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले काही अपक्ष उमेदवार अर्जावर स्वतःची स्वाक्षरी करण्यास विसरले, काही जणांनी सुचक-अनुमोदक नियमापेक्षा कमी दाखविले, तर काहींनी आपला उमेदवारी अर्जच कोरा ठेवला. अशा वेगवेगळ्या कारणांमुळे वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघातील सहा उमेदवार निवडणूक लढविण्यासाठी अपात्र ठरले, तर 17 जण पात्र ठरले. 

विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज छाननी करण्यासाठी शनिवारचा दिवस राखीव ठेवण्यात आला होता. त्यानुसार वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघासाठी उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या उमेदवारांच्या अर्जांची छाननी शनिवारी सकाळी येरवडा क्षेत्रीय कार्यालयातील निवडणुक निर्णय अधिकाऱ्यांच्या कार्यालयात झाली. निवडणुक निर्णय अधिकारी संजीव देशमुख व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी रोहिणी आखाडे यांच्या उपस्थितीत अर्जांची छाननी झाली. 

अपक्ष दादू रणशिंग यांनी अर्जावर एक सुचक व अनुमोद कमी उल्लेख केल्याने, तर हनुमंत पांडागळे यांनी आपल्या अर्जावर एका ठिकाणी स्वाक्षरी केली नसल्यामुळे त्या दोघांचा अर्ज बाद ठरविण्यात आला. मोहन लोणकर या अपक्ष उमेदवाराने आपला उमेदवारी अर्ज कोरा ठेवला, अनामत रक्कमही भरली नाही. त्यामुळे त्यांचाही अर्ज बाद करण्यात आला. तर विशाल गोरे यांचा अर्ज अपुर्ण असल्याने तो बाद करण्यात आला. 

भाजपचे उमेदवार जगदीश मुळीक यांचे बंधू योगेश मुळीक यांचे दोन अर्ज व राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार सुनील टिंगरे यांच्यसमवेत अर्ज दाखल करणारे बापू पठारे यांचे 'डमी' अर्ज यावेळी अपात्र ठरले. 32 पैकी 23 जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. त्या 23 जणांपैकी सहा जणांचे अर्ज अपात्र ठरले, तर 17 जणांचे अर्ज पात्र ठरल्याचे संजीव देशमुख यांनी स्पष्ट केले.  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

iphoneच्या इतिहासात पहिल्यांदाच! Appleने लॉन्च केला पहिला फोल्डेबल iPhone Duo; मिळणार iPadसारखा अनुभव

iPhone 18 Pro अन् Pro Max मध्ये Apple ने केला मोठा धमाका! 2nm चिप, जबरदस्त कॅमेरा अन् AI फीचर्सने वेधलं लक्ष; किंमत किती?

Joe Root Record: सचिन तेंडुलकर - जेम्स अँडरसननंतर फक्त रुटनेच केला तो पराक्रम! पाँटिंग-स्टीव्ह वॉ यांचा मोडला विक्रम

Vastu Tips: घरात-बाल्कनीत पक्ष्यांचे घरटे असावे की नाही? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या घरटे हटवणे योग्य की अयोग्य?

Pune News : सत्ता असूनही प्रशासनावर अंकुशच नाही! भाजप नगरसेवकांचा घरचा आहेर; पदाधिकाऱ्यांवरही व्यक्त केली नाराजी

SCROLL FOR NEXT