vadgav sheri businessman
vadgav sheri businessman sakal
पुणे

Crime News : गुंडांच्या दहशतीमुळे व्यावसायिक तणावाखाली; पोलिसांचे मात्र कानावर हात

सकाळ वृत्तसेवा

वडगाव शेरी - दुचाकीवर येत दहा गुंडांनी वडगाव शेरी परिसरातील व्यवसायिकांना दमबाजी करीत दहशत माजवली. या टोळक्याने पाणीपुरीच्या गाड्या रस्त्यावर उलट्या केल्या. काहींचा माल रस्त्यावर फेकून दिला. त्यामुळे या भागतील व्यावसायिक दहशतीखाली आले आहेत. या प्रकरणाची माहिती कळहुनही, असा प्रकार घडलाच नाही, म्हणत चंदननगर पोलिसांनी सरळ कानावर हात ठेवले आहेत.

या घटनेचे प्रत्यक्षदर्शी साक्षीदार असलेले वडगाव शेरी नागरिक मंचाचे अध्यक्ष आशिष माने यांनी घडलेला हा दहशतीचा प्रकार तात्काळ चंदननगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र लांडगे यांना दूरध्वनी करून कळवला होता.

वडगाव शेरी येथील सुंदरबाई मराठे आणि गणेश नगर चौकापासून सोमवारी (ता ४) रात्री दहा वाजण्याच्या सुमारास तीन दुचाकीवरून दहा तरुणांच्या टोळक्याने आनंद पार्कच्या दिशेने जाताना मोठ्याने दमबाजी करीत दहशत माजवली. त्यांनी तीन जागी पाणीपुरीच्या गाड्या रस्त्यावर उलट्या केल्या. तसेच एका जागी पाणीपुरीचा माल रस्त्यावर फेकला. गुंडांची दहशत पाहून कोणीही नागरिक व व्यावसायिक प्रतिकार करण्यासाठी पुढे आले नाही.

आशिष माने यांनी हा सर्व प्रकार पाहिला. त्यांनी पोलिसांना कळवल्यानंतर पोलीस घटनास्थळी आले. 24 तासात आम्ही गुंडांना पकडतो असे आश्वासन दिले. मात्र मंगळवारी सायंकाळी पाच वाजेपर्यंत कोणत्याही गुंडांना अटक झाली नाही.

याविषयी चंदननगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र लांडगे म्हणाले, गुंडांनी दहशत माजवल्याची माहिती मिळाली होती. आम्ही पोलीसही पाठवले. परंतु हा प्रकार दहशतीचा नसून किरकोळ वादातून हे घडले होते. त्यांनी आपापसात प्रकरण मिटवले आहे. वडगाव शेरीत दहशत माजवण्याचा प्रकार घडला नाही.

पोलीस खोटं बोलत आहेत……

वडगाव शेरीत भर रस्त्यावर गुंडांनी दहशत माजवली. पाणीपुरीच्या गाड्या उलट्या केल्या. माल रस्त्यावर फेकला, याचे माझ्यासहित अनेक लोक साक्षीदार आहेत. मात्र असे काही घडले नसल्याचे पोलीस सांगत असतील, तर ते खोटं बोलत आहेत. सदर गुंडांवर कारवाई न झाल्यास व्यावसायिक आणि नागरिक चंदननगर पोलीस ठाण्यावर मोर्चा काढू.

- आशिष माने (वडगाव शेरी नागरिक मंच)

व्यावसायिक तणावाखाली….

आपण तक्रार दिली तर गुंड त्रास देतील या भीतीपोटी अनेक व्यावसायिक तणावाखाली असल्याचे आज जाणवले. त्यामुळे व्यवसायिकांनी प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. व्यवसायिकांमध्ये पोलिसांबद्दल विश्वास निर्माण करण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. तरच व्यावसायिक निर्भीडपणे पुढे येऊन तक्रार देतील.

वडगाव शेरीत घडलेल्या प्रकाराची समाज माध्यमावर चर्चा सुरू आहे. त्याचे फोटो प्रसिद्ध करण्यात आले आहेत. नागरिकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. त्याचीही दखल अद्याप पोलिसांनी घेतली नसल्याचे जाणवते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Devendra Fadanvis: 'उद्धव ठाकरेंचं रडगाणं सुरू, पराभव समोर दिसू लागल्यानेच त्यांची मोदींवर टीका'; देवेंद्र फडणवीसांचा आरोप

Latest Marathi Live News Update : तामिळनाडूत रात्रीपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे पूरस्थिती

Rohit Sharma: रोहितने प्रायव्हसीचा भंग करण्याच्या आरोपावर स्टार स्पोर्ट्सनं दिलं स्पष्टीकरण

Anuskura Ghat : अणुस्कुरा घाटातील जंगलात लपलेल्या चोरट्यांच्या आवळल्या मुसक्या; मागावर होतं तब्बल 30 पोलिसांचं पथक, असं काय घडलं?

Accident News : छत्तीसगडमध्ये मृत पावलेले १८ जण आदिवासींच्या संरक्षित जमातीमधील; राष्ट्रपतींनी व्यक्त केल्या संवेदना

SCROLL FOR NEXT