telephone1. 
पुणे

वडगाव निंबाळकर पोलिस ठाणे "नॉट रिचेबल'

चिंतामणी क्षीरसागर ः सकाळ वृत्तसेवा

महिनाभरापासून दूरध्वनी आणि मोबाईल बंद;

संपर्क साधण्यात अडचणी

वडगाव निंबाळकर (पुणे) ः बारामती तालुक्‍यातील सर्वाधिक गावे समाविष्ट असलेल्या वडगाव निंबाळकर पोलिस ठाण्याचा दूरध्वनी आणि मोबाईल महिनाभरापासून बंद आहे. त्यामुळे "नॉट रिचेबल' असलेल्या या ठाण्याशी संकटकाळी संपर्क कसा साधायचा, असा प्रश्‍न नागरिकांना पडला आहे.


दरम्यान, "बीएसएनएल'च्या तांत्रिक अडचणीमुळे दूरध्वनी सेवा बंद आहे, तर मुख्यालयाकडून मोबाईल रिचार्ज केला जात नसल्याने तोही अडगळीत पडला आहे, असे पोलिसांनी सांगितले.

तालुक्‍यातील सर्वाधिक 65 गावे वडगाव निंबाळकर पोलिस ठाण्यांतर्गत येतात. मुख्यालय आणि हद्दीतील गावे यामधील अंतर मोठे आहे. घडलेल्या घटनेबाबत पोलिसांशी संपर्क साधण्याचा एकमेव मार्ग म्हणजे दूरध्वनी किंवा मोबाईल. हद्दीतील गावांत काही घडल्यास नागरिक दूरध्वनीवरून संपर्क साधून पोलिसांना कळवत होते. या पूर्वी परिसरात कार्यरत असलेल्या अनेक पोलिस कर्मचाऱ्यांच्या बदल्या झाल्या आहेत. नव्याने पदभार घेतलेल्या पोलिसांचा संपर्क क्रमांक नागरिकांकडे नाही,त्यामुळे एखादी घटना घडल्यास संपर्क साधायचा कसा, असा प्रश्न सर्वसामान्यांसमोर आहे.

बीएसएनएलची सेवा खंडित झाल्यास पोलिस ठाण्यात नागरिकांना संपर्क करता यावा, यासाठी मुख्यालयाकडून ठाण्याला एक मोबाईल दिला होता. तोही मोबाईलही रिचार्ज न केल्याने महिनाभरापासून बंद आहे. संपर्काची दोन्ही साधने बंद असल्याने थेट पोलिस ठाण्यात जावे लागत आहे. पोलिसांचा वैयक्तिक नंबर ठराविक लोकांकडे असतो,त्यांच्याशी प्रथम संपर्क साधून पुढे निरोप देण्याची वेळ नागरिकांवर आली आहे.

पोलिस ठाण्याचा संपर्क क्रमांक बंद असल्याबाबत येथील अधिकाऱ्यांना अनेकदा ग्रामस्थांनी भेटून सांगितले; पण त्याबाबत उपाय योजना झालेल्या नाहीत. आता वरिष्ठ अधिकाऱ्यांनी यात लक्ष घालून नागरिकांची समस्या दूर करावी, अशी मागणी होत आहे.

दूरध्वनी सेवेबाबत आम्ही बीएसएनएलकडे तक्रार नोंदविली आहे. त्यांच्या तांत्रिक चुकीमुळे दूरध्वनी बंद राहत आहे. वरिष्ठ कार्यालयाकडून मोबाईल रिचार्ज केला जात नसल्यामुळे तोही बंद आहे.
-सोमनाथ लांडे,
सहायक पोलिस निरीक्षक,वडगाव निंबाळकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT