पुणे

वैराग नगरपंचायतीमध्ये विषय समिती व सभापती निवडी

CD

VRG26B06234
वैराग (ता. बार्शी) : नगरपंचायतीच्या विषय समिती व सभापती निवडीवेळी उपनगराध्यक्ष निरंजन भूमकर, पीठासीन अधिकारी तैमूर मुलाणी, नगरसेवक व नगरसेविका आदी.
---
वैराग नगरपंचायतीच्या विविध
समित्यांच्या सभापतींची निवड
सकाळ वृत्तसेवा
वैराग, ता. १ : वैराग नगरपंचायतीच्या स्थायी व विषय समिती सभापतींच्या निवडीसाठी शुक्रवारी (ता. २७) पीठासन अधिकारी तथा बार्शी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी तैमूर मुलाणी यांच्या अध्यक्षतेखाली विशेष सभा पार पडली. या सभेत उपनगराध्यक्ष निरंजन भूमकर, जयश्री घोडके, अजयकुमार काळोखे व अक्षय ताटे यांची विविध समित्यांच्या सभापतिपदी निवड करण्यात आली.
नगरपंचायतीच्या समित्यांची मुदत संपत असल्याने शेवटच्या वर्षासाठी नव्याने निवडी करण्यात आल्या. स्थायी समितीच्या पदसिद्ध सभापती म्हणून नगराध्यक्षा सुजाता डोळसे कार्यरत आहेत. उपनगराध्यक्ष भूमकर यांनी सार्वजनिक बांधकाम व नियोजन विकास समितीचे सभापतिपद कायम राखले.
महिला व बालकल्याण समिती सभापतिपदी जयश्री घोडके, पाणीपुरवठा व जलनिस्सारण समिती सभापतिपदी अजयकुमार काळोखे, तर सार्वजनिक आरोग्य व दिवाबत्ती समिती सभापतिपदी अक्षय ताटे यांची निवड करण्यात आली. विरोधी पक्ष गटनेते शाहूराजे निंबाळकर यांच्यासह अर्चना रेड्डी, राणी आदमाने व श्रीशैल्य भालशंकर यांचा विविध समित्यांमध्ये समावेश करण्यात आला.
सभेस खंडेराया घोडके, रोप बागवान, सतीश सुरवसे, अतुल मोहिते यांच्यासह नगरसेवक, नगरसेविका व कर्मचारी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran Interim Supreme Leader : अयातुल्ला अराफी बनणार इराणचे सर्वोच्च नेते ! खामेनी यांच्या मृत्युनंतर मोठी जबाबदारी

How Much Prize Money Will Pakistan Get? पाकिस्तानी २७-२८ कोटी जिंकण्याच्या इराद्याने आले होते, बघा किती बक्षीस रक्कमेवर समाधान मानावे लागले...

इराण-अमेरिका युद्धादरम्यान दुबई आणि UAE मध्ये अडकल्या बॉलिवूडच्या दोन अभिनेत्री ; "अत्यंत भीतीदायक वातावरण.."

Sakal Property Mahayatra : नाशिकमध्ये घराचं स्वप्न आता होणार पूर्ण! मालेगावात 'सकाळ प्रॉपर्टी महायात्रा' प्रदर्शनाचा दिमाखदार प्रारंभ

karad Crime: कऱ्हाडमध्ये आणखी एक बांगलादेशी महिला ताब्यात; पाेलिसांचा मलकापुरात छापा, दुसऱ्या नावाचे आधारकार्ड!

SCROLL FOR NEXT