कडूस, ता. ३ ः दोंदे (ता. खेड) येथील सेवानिवृत्त वरिष्ठ पोलिस अधिकारी ॲड. पांडुरंग तथा बाळासाहेब कोहिनकर यांनी पत्नीच्या स्मरणार्थ गावासाठी सुसज्ज असा वैकुंठरथ अर्पण केला. त्यांच्या या सामाजिक दातृत्वाचे पंचक्रोशीतून कौतुक होत आहे.
दोंदे गावचा शेती हाच मुख्य व्यवसाय. शेतीला प्राधान्य असल्याने बहुसंख्य ग्रामस्थ गावठाण सोडून परिसरातील शेत-शिवारांत वास्तव्यासाठी विखुरले आहेत. गावच्या परिसरात एखाद्या व्यक्तीचे निधन झाले तर मृतदेह खांद्यावर वाहून आणावा लागतो. अंत्ययात्रेची साधनसामग्री घेऊन अंत्यविधीसाठी प्रवास करताना ग्रामस्थांची मोठी ओढाताण होते. गावची हीच गरज लक्षात घेऊन ॲड. कोहिनकर व परिवाराने सामाजिक बांधिलकी जोपासत दिवंगत पत्नी सुषमाताई पांडुरंग कोहिनकर यांच्या स्मरणार्थ स्वखर्चाने वैकुंठरथ दिला आहे. चारचाकी वाहनावर सुसज्ज असा हा वैकुंठरथ आहे. गावच्या सेवेसाठी अर्पण केलेल्या या वैकुंठरथाच्या चाव्या सोमवारी (ता. २) ग्रामपंचायतीकडे सुपूर्द करण्यात आल्या.
यामुळे मृतदेह नदीपर्यंत आणण्यासाठी ग्रामस्थांना सोयीचे व सुलभ होणार आहे. ॲड. कोहिनकर यांच्या हस्ते सरपंच प्रतिक्षा दरवडे, माजी सरपंच हनुमंत कदम, चंद्रकांत बारणे, माजी उपसरपंच भरत उढाणे, खंडेराव करंडे यांनी वैकुंठरथाच्या चाव्या स्वीकारल्या. यावेळी तालुका खरेदी विक्री संघाचे संचालक दत्तात्रेय शितोळे, माजी उपसरपंच सिध्दार्थ कोहिनकर, आनंदराव कदम, सोसायटीचे माजी अध्यक्ष ज्ञानेश्वर कदम, बाळासाहेब मंडलिक, किसनराव लगड, यात्रा समितीचे अध्यक्ष सोमनाथ बारणे, जयराज कोहिनकर, पंडित उढाणे, बाळासाहेब बनकर, मुकुंद गारगोटे, शिवकुमार सुकाळे, तानाजी बारणे, अतुल भालसिंगे व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. वैकुंठरथाच्या देखभाल-दुरुस्तीसाठी ग्रामस्थांच्या सहकार्याने ग्रामपंचायत नियोजन करणार आहे. माजी उपसरपंच भरत उढाणे यांनी आभार मानले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.