hotel vaishali 
पुणे

पुण्यातील 'ही' प्रसिद्ध हॉटेल्स सर्वात अस्वच्छ

सकाळवृत्तसेवा

पुणेः पुण्यातील हॉटेल्ससाठी प्रसिद्ध असणाऱ्या फर्ग्युसन कॉलेज रस्त्यावरील अतिशय नामांकित असणाऱया हॉटेल्समध्ये मोठ्या प्रमाणात अस्वच्छता असल्याचे नुकतचे समोर आले आहे. अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) दिलेल्या अहवालातून ही बाब समोर आली आहे.

फर्ग्युसन कॉलेज रस्त्यावरील वैशाली, रुपाली आणि कॅफे गुडलक ही हॉटेल्स खवय्यांसाठी अतिशय प्रसिद्ध आहेत. येथे नेहमीच गर्दी असून, अनेकदा थांबावे लागते. यामध्ये तरुणाईचा सहभाग सर्वात जास्त असतो. मात्र, या हॉटेलचे भटारखाने अतिशय गलिच्छ असल्याचे एफडीएने दिलेल्या अहवालात म्हटले आहे.

हॉटेलच्या स्वच्छतेबाबत एफडीएचे काही निकष आहेत. हे निकष हॉटेल्सकडून पाळण्यात येतात का? याची पाहणी एफडीएने अचानक केली. यावेळी प्रचंड अस्वच्छता असल्याचे समोर आले आहे. वैशाली हॉटेलच्या भटारखान्यात मोठ्या प्रमाणात कचरा होता. अन्नपदार्थ बनविण्यासाठी वापरण्यात येणारी भांडीही खराब अवस्थेत होती. शेफही स्वच्छतेच्या बाबतीत निष्काळजी असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले होते. रुपाली हॉटेलची स्थितीही अशीच असल्याचे अहवालात म्हटले आहे. गुडलक चौकात असलेले कॅफे गुडलक हे इराणी हॉटेलही अतिशय अस्वच्छ असल्याचे समोर आले आहे. याठिकाणच्या स्वयंपाकघरात कोळ्यांची जाळी आणि कचरा आढळला.

हॉटेलमध्ये आढळलेल्या अस्वच्छ कारभारामुळे एफडीएने या हॉटेल्सना नोटीस दिली आहे. शिवाय, एफडीएचे नियम पाळावेत असेही सांगितले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'बच्चे बडे हो जाते हैं, लीग खतम नही होती!' Wasim Akram ची आयपीएल वेळापत्रकावर टीका; म्हणाला, PSL No. 1

lawyer Rakesh Kishor assaulted in Court Video : माजी सरन्यायाधीश गवईंवर बूट फेकणाऱ्या वरिष्ठ वकिलास न्यायालयाच्या आवारातच चपलेने मारहाण!

Self-Priority Tips: थोडंसं स्वार्थी होणं कधी योग्य? जाणून घ्या त्या 5 परिस्थिती ज्या वेळी स्वतःलाच प्राधान्य द्यायला हवं...

इंग्लंडच्या कर्णधारावर IPL 2026 खेळण्यावर का घातलीय बंदी? जाणून घ्या नवीन नियम

Latest Marathi News Live Update : मुंबई पोलिसांनी केली अंमली पदार्थांविरोधी मोठी कारवाई

SCROLL FOR NEXT