पुणे

वळसंगमधील स्थिती निवळली, गावात पोलिसांचा बंदोबस्त

CD

वळसंगमधील स्थिती निवळली; पोलिस बंदोबस्त कायम
पाच जणांना अटक; मुख्य संशयित यासीन कटरेसह २३ जण फरार

सकाळ वृत्तसेवा
सोलापूर, ता. १३ : वळसंग (ता. दक्षिण सोलापूर) येथे ‘तू मोठा का मी मोठा’ या वर्चस्वाच्या वादातून बुधवारी (ता. ९) दोन गटांत हाणामारी झाली. यात सहाजण जखमी झाले. त्यापैकी सद्दाम हमिद अमलीचुंगे (वय ३७) यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी संशयितांविरुद्ध वळसंग पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे. आतापर्यंत पाच जणांना अटक झाली असून गावातील परिस्थिती सध्या शांत आहे. तरीही खबरदारी म्हणून पोलिस बंदोबस्त कायम ठेवण्यात आला आहे.
तंटामुक्त समितीचे नूतन अध्यक्ष मोहसीन वजीर तांबोळी आणि यासीन अब्बास कटरे हे हाणामारीचे मूळ सूत्रधार असल्याचे गावकऱ्यांचे म्हणणे आहे. मौला हमिद अमलीचुंगे (वय ४५, रा. वळसंग) यांच्या फिर्यादीवरून यासीन कटरे, मोहसीन तांबोळी, जाविद कटरे, सलीम तांबोळी, बुडन नुरेवाले, बुडन कटरे, करिम फुलारी, इलाई माशाळकर, जावेद कटरे, समीर कटरे, सैपन तांबोळी, हमीद सय्यद, हज्जू कटरे, जुबेर फुलारी, महेबूब कटरे, अरबाज फुलारी, अश्पाक माशाळकर, फातिमा नुरेवाले, मौला तांबोळी यांच्यासह अन्य नऊ जणांविरुद्ध गुन्हा दाखल आहे.
यातील मोहसीन, अश्पाक, सलीम, हमीद व मौला यांना अटक करण्यात आली आहे. त्यांची पोलिस कोठडी मंगळवारी (ता. १५) संपणार आहे. अटकेतील संशयितांकडे पोलिसांनी तपास केला. त्यावेळी ते एकमेकांकडे बोट दाखवत असल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले.
--------------------------
मृत सद्दाम अमलीचुंचे वर्चस्व मान्य नव्हते
वळसंग गावच्या तंटामुक्त समितीचे अध्यक्ष मोहसीन तांबोळी झाले होते. तरीही गावातील लोक भांडणे मिटविण्यासाठी सद्दाम अमलीचुंगे यांच्याकडेच येत होते. ही बाब मोहसीन, यासीनसह इतर संशयितांना खटकत होती. या वर्चस्वाच्या वादातून गावात भरदुपारी हाणामारी झाली. त्यात गंभीर जखमी सद्दाम यांचा मृत्यू झाला. गावात कायमची शांतता निर्माण व्हावी आणि गटागटांतील वाद कायमचे मिटावेत, यादृष्टीने वळसंग पोलिस कारवाई करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shah Eknath Shinde Meeting : अमित शहा-एकनाथ शिंदे यांच्यात अर्धा तास चर्चा; एकाच कारमधून प्रवास, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

IND vs AFG, Video: बुमराह आला अन् दुसऱ्याच बॉलवर विकेट घेतली! भुवनेश्वर कुमारच्या पंक्तीत मिळवलं स्थान

पेट्रोल-डिझेल आणखी महागणार? सौदीची पाइपलाइन बंद, फक्त ५ ते ७ दिवसांचा तेलसाठा शिल्लक

Marathi News Live Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं जाणून घ्या एका क्लिकवर...

युनायटेड किंगडममध्ये फूट पडणार? स्कॉटलंड, वेल्स अन् नॉर्दर्न आयर्लंडचे नेते करणार मोठी घोषणा?

SCROLL FOR NEXT