Chirag Doshi Sakal
पुणे

Chandrayaan-3 : चांद्रयान-३ मोहिमेमध्ये वालचंदनगर कंपनीचा मोलाचा सहभाग

भारताच्या महत्वकांक्षी चांद्रयान - ३ मोहिमेमध्ये वालचंदनगर (ता.इंदापूर) येथील वालचंदनगर कंपनीचा मोलाचा सहभाग.

राजकुमार थोरात

वालचंदनगर - भारताच्या महत्वकांक्षी चांद्रयान - ३ मोहिमेमध्ये वालचंदनगर (ता.इंदापूर) येथील वालचंदनगर कंपनीचा मोलाचा सहभाग असून चांद्रयानाच्या यशामुळे वालचंदनगर कंपनीच्या शिरपेचामध्ये आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला असल्याची माहिती वालचंदनगर कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी चिराग दोशी यांनी दिली.

भारतीय अवकाश संशोधन संस्थेच्या (इस्त्रो) च्या चांद्रयान - ३ या महत्वकांक्षी मोहिमेस आज सुरवात झाली. संपूर्ण जगाचे लक्ष चांद्रयान मोहिमेकडे लागले आहे. आज रॉकेटच्या साहय्याने चांद्रयान आकाशाकडे झेपावले.

२३ ऑगस्टला चांद्रयान चंद्रावरती उतरणार आहे. चांद्रयान मोहिमेच्या उड्डानासाठी वापरण्यात आलेल्या रॉकेटला सहा बुस्टर मोटर्स होत्या. यातील चार बुस्टर मोटर्सची (एस-२००) निर्मिती वालचंदनगर कंपनीने केली होती. यामध्ये हेड एन्ड सेगमेंट, मिडल सेगमेंट, नोझल एन्ड सेगमेंट तसेच प्लेक्स नोझल कंट्रोल टॅक या महत्वाच्या उपकरणाचा समावेश आहे.

ही सर्व उपकरणे उड्डानाच्या पहिल्या स्टेज साठी वापरण्यात आली. चांद्रयान - १ व चांद्रयान - २ मोहिमेमध्ये ही वालचंदनगर कंपनीचा मोलाचा वाटा होता.तसेच मंगळयान मोहिमेमध्ये वालचंदनगर कंपनीचे योगदान होते. स्वातंत्र्यपूर्व काळापासुन वालचंदनगर कंपनीचा देशउभारणच्या कामामध्ये मोलाचा सहभाग आहे.

एरोस्पेस,डिफेन्स,अणुउर्जा क्षेत्रामध्ये कंपनी देशाच्या प्रगतीसाठी कार्यरत आहे.कंपनीने पाणबुडीसाठी महत्वाचे असणारे अनेक भाग ही तयार केले आहेत. गेल्या पाच दशाकापासुन वालचंदनगर कंपनी एरोस्पेस क्षेत्राशी संलग्न काम करीत असून अनेक महत्वाची उपकरणे तयार करीत आहेत. चांद्रयान -३ मोहिमेच्या यशाबद्दल वालचंदनगर कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी चिराग दोशी यांनी कंपनीतील इंजिनिअर, कामगारांचे अभिनंदन केले.

गगनयानामध्ये कंपनीचा सहभाग...

भारताच्या महत्वकांक्षी गगनयान मोहिमेसाठी महत्वाची उपकरणे बनविण्याचे काम वालचंदनगर मध्ये सुरु आहे. यातील काही उपकरणे कंपनीने तयार करुन इस्त्रोकडे हस्तांतर केली आहेत.तसेच अनेक उपकरणे बनविण्याचे ही काम सुरु आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan T20 WC Qualification Scenario : भारताकडून हार अन् पाकिस्तानी बेजार! गुणतालिकेत उलथापालथ, अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर, पाकडे Super 8s मध्ये कसे पोहोचणार?

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

Harshvardhan Sapkal : 'मुंबईतील रस्त्याला 'टिपु सुलतान'चं नाव देण्याचा भाजपने दिला होता प्रस्ताव', हर्षवर्धन सपकाळांनी थेट पुरावाच सादर केला..

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

SCROLL FOR NEXT