hadapsar beef tempo 
पुणे

पुण्यात गोमांस घेऊन जाणारा टेम्पो पडकला; चालक फरार

सकाळ डिजिटल टीम

हडपसर -  गोमांस वाहतूक करणाऱा टेम्पो पकडण्यात आला. वानवली पोलिसांनी टेम्पो ताब्यात घेतला असून चालक फरार झाला आहे. गोरक्षकांच्या सतर्कतेमुळे हा प्रकार उघडकीस आला आहे.

इंदापूर इथं गोवंशाची कत्तल करून तब्बल अडीच टन गोमांस कॅम्प इथं एका टेम्पोमधून नेण्यात येत होतं. टेम्पोची तपासणी केली असता त्यामध्ये गाय, बैल यांची मुंडकी आणि मांस व पाय आढळले. या प्रकरणी पोलिस शिपाई कैलास माळकर यांनी फिर्याद दिली. 

याबाबत मिळालेली माहिती अशी की, मंगळवारी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास रामटेकडी रेल्वे उड्डाणपूलावर महिंद्रा पीकअप ( एमएच १४ एस ३३८६ )मधून टेंम्पोतून रक्त खाली पडत होते. तेव्हा शादाब मुलाणी यांच्या लक्षात ही बाब आली. त्यानंतर कुणाल साठे, अभिजित शिंदे, उपेंद्र बलकवडे, सचिन जवळगे, गौरव पाटील, श्रीकांत कोळी यांनी टेम्पोचा पाठलाग केला. बुध्द विहार येथे टेम्पोच्या चालक बीआरटीमध्येच टेम्पो सोडून फरार झाला. 

टेम्पो चालक फरार झाल्यानंतर शादाब मुलाणी यांनी 100 क्रमांकावर पोलिसांशी संपर्क साधला. संबंधित प्रकाराची माहिती मिळताच वानवडी पोलिस घटनास्थळी आले. तेव्हा वाहतूक कोंडी झाल्याने ट्रक बाजूला काढण्यात आला. पुढील तपास वानवडी पोलिस करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

कोण होणार पश्चिम बंगालचा नवा मुख्यमंत्री कोण? ममतांच्या एकेकाळच्या सहकाऱ्यासह ३ नावं चर्चेत, अमित शहांनी...

Thalapathy Vijay : थलपती विजयची ऐतिहासिक विजयाकडे कूच अन् Jofra Archer च्या जुन्या ट्विटचा इंटरनेटवर धुमाकूळ

Assembly election results 2026 Live Update : आसाममध्ये भाजपचं शतक, काँग्रेसचे २१ उमेदवार आघाडीवर

Love Numerology : 'या' 2 मुलांकाचे लोक प्रेमात होतात अयशस्वी; हार्ट ब्रेकमुळे बनतात प्रचंड स्ट्रॉन्ग, जीवनात मिळवतात मोठं यश

West Bengal Result: बंगालचा विजय अचानक नाही! २०१४ मध्येच लिहिलेली विजयाची स्क्रिप्ट; १२ वर्षांचा ‘मास्टर प्लॅन’ हिट, वाचा इनसाइड स्टोरी

SCROLL FOR NEXT