Vande Bharat Express sakal
पुणे

Vande Bharat Express : पुण्यात वंदे भारतचा कोचिंग डेपो वर्षभरात

वंदे भारत एक्स्प्रेसच्या रेकच्या देखभाल व दुरुस्तीसाठी घोरपडीत कोचिंग मेन्टेनन्स डेपो बांधण्याच्या कामास लवकरच सुरुवात होणार आहे.

सकाळ वृत्तसेवा

पुणे - वंदे भारत एक्स्प्रेसच्या रेकच्या देखभाल व दुरुस्तीसाठी घोरपडीत कोचिंग मेन्टेनन्स डेपो बांधण्याच्या कामास लवकरच सुरुवात होणार आहे. लवकरच निविदा प्रक्रिया सुरु होईल. काम पूर्ण होण्यासाठी किमान एका वर्षाचा कालावधी अपेक्षित आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मंगळवारी विविध रेल्वे प्रकल्पांचे उद्घाटन झाले. लवकरच निविदा प्रक्रियेला सुरवात होईल. रेल्वेच्या बांधकाम विभागाकडे या कामाचे हस्तांतर झाले आहे. सुमारे ८९ कोटी रुपये खर्चून हा डेपो बांधण्यात येईल.

मध्य रेल्वेचा हा दुसरा डेपो असेल. एकाच वेळी तीन वंदे भारतच्या रेकची देखभाल व दुरुस्ती येथे होईल. हा डेपो तयार झाल्यानंतर पुण्यातून वंदे भारत सेवा सुरु होणार आहे. सध्या मध्य रेल्वेत केवळ मुंबई विभागात वाडी बंदर येथे असा डेपो बांधण्यात आला आहे. यात पहिल्यांदाच ‘कव्हर्ड (छत) पिटलाईन’ बांधण्यात येईल.

सध्या पुण्याहून एकच वंदे भारत

सध्या पुणे स्थानकावरून सोलापूर-मुंबई वंदे भारत एक्स्प्रेस धावते. या रेकचे देखभाल व दुरुस्ती वाडी बंदर येथेच होते. पुणे विभागाची एकही वंदे भारत अद्याप सुरु झालेली नाही. ती सुरु होण्यासाठी कोचिंग डेपो बांधणे अत्यंत महत्त्वाचे आहे. वंदे भारतच्या डब्यांची रचना अन्य डब्यांप्रमाणे नसल्याने याच्या सुरक्षेसाठी छत बनवले जात आहे.

पुणे - सिकंदराबाद, पुणे-बडोदा या दोन मार्गांवर वंदे भारत सुरु होण्याची शक्यता आहे. मात्र रेल्वे बोर्डाकडून तसा कोणताही निर्णय अद्याप झालेला नाही. येत्या चार ते पाच महिन्यांत आणखी वंदे भारत सुरु होण्याची शक्यता नाही.

वंदे भारत एक्स्प्रेससाठी कोचिंग डेपो असणे आवश्यक आहे. लवकरच यासाठीच्या निविदा प्रक्रियेला सुरवात होईल. ‘पिट लाइन’सह ‘स्टेबलिंग लाइन’ही येथे असेल.

- इंदू दुबे, विभागीय रेल्वे व्यवस्थापक, पुणे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मनोज जरांगेंच्या भूमिकेवर मंत्रिमंडळात नाराजीचा सूर; बैठकीनंतर अधिकाऱ्यांना बाहेर जाण्यास सांगण्यात आलं अन्...; नेमकं काय घडलं?

Manoj Jarange Patil : मनोज जरांगे पाटील मुंबई दौरा रद्द करणार? प्रकृतीवर परिणाम; पुढचा निर्णयही सांगितला

शाळेतल्या मित्राने PM मोदींची भेट घेतली, आता भाजप आमदाराने मित्राच्या मुंबईतील जमिनीवरचा ताबा सोडला

Marathi News Live Updates : मुंबईत मालिका रुग्णालयात गॅस गळतीने स्फोट, दोघे होरपळले

पाकिस्तानातील कराचीत गणपती बाप्पा मोरयाचा गजर! मराठी कुटुंबाकडून साजरा केला जातो गणेशोत्सव, आरतीचा VIDEO VIRAL

SCROLL FOR NEXT