Vande Bharat Sakal
पुणे

Vande Bharat : वंदे भारत स्लीपरसाठी पहिलं पाऊल; लातूरमध्ये डब्याचा सांगाडा दाखल; २०२६ मध्ये पहिला प्रवास

Indian Railways : लातूर येथील मराठवाडा कोच फॅक्टरीत तयार होणाऱ्या ‘वंदे भारत’ स्लीपर डब्यांचे उत्पादन जून २०२६ पर्यंत पूर्ण होणार असून, सध्या त्यासाठीचे ढाचे दाखल झाले आहेत.

सकाळ वृत्तसेवा

प्रसाद कानडे

पुणे : लातूरमधील मराठवाडा कोच फॅक्टरीतून ‘वंदे भारत’ एक्स्प्रेसच्या स्लीपर (शयनयान) डब्यांसाठी प्रवाशांना आणखी काही महिने प्रतीक्षा करावी लागणार आहे. लातूरमधील कोच फॅक्टरीमध्ये नुकतेच चेन्नई येथील एका कंपनीत तयार करण्यात आलेला डब्यांचा सांगाडा (कारबॉडी) दाखल झाला आहे. डब्यांच्या उत्पादनासंदर्भात रेल्वे बोर्ड व ‘किनेट’ या कंपनीमध्ये करार झाला. त्यानुसार डब्यांची जुळणी झाल्यावर वेगवेगळ्या पातळीवर तपासणी केली जाईल. त्यानंतरच प्रत्यक्षात डब्यांच्या उत्पादनाला सुरुवात होणार आहे. जून २०२६पर्यंत वंदे भारत एक्स्प्रेसचा एक स्लीपर रेक तयार होईल.

लातूर फॅक्टरीत सुमारे १० हजार कर्मचारी कार्यरत आहेत. तसेच या ठिकाणी आधुनिक मशिनच्या साहाय्याने डब्याचे उत्पादन केले जाणार आहे. लातूर येथील मराठवाडा रेल कोच कारखाना ३५१ एकरमध्ये बांधण्यात आला आहे. ११ प्रगत असेंब्ली स्टेशन बनविण्यात आले आहेत. तसेच कार बॉडी शॉप, वेअरहाऊस, असेंब्ली, टेस्टिंग, बोगी आणि पेंट शॉपसह विविध कार्यशाळा तयार करण्यात आल्या आहेत. कारखान्याच्या अंतर्गत ८.६ किलोमीटर लांबीचा ट्रॅक आहे.

मराठवाडा कोच फॅक्टरीमध्ये डबे तयार करण्यासाठी आवश्यक असलेली यंत्रणा सज्ज आहे. नुकतेच वंदे भारत स्लीपरची ‘कारबॉडी’ दाखल झाली. डब्याचा आराखडा तयार झाल्यावर त्याची वेगवेगळ्या पातळीवर चाचणी होईल, त्यानंतर प्रत्यक्षात डब्यांचे उत्पादन सुरू होईल.

- अभिषेक मिश्रा, जनसंपर्क अधिकारी, लातूर मराठवाडा कोच फॅक्टरी

टप्प्याटप्प्याने डब्यांचे उत्पादन

  • लातूरमधील कारखान्यात १९२० डब्यांचे उत्पादन केले जाणार आहे

  • पहिल्यांदा २ रेक अर्थात ३२ डबे तयार केले जाणार आहेत

  • हळूहळू डब्यांचे उत्पादन वाढवले जाणार

  • डब्यांची देखभाल-दुरुस्ती बंगळूर, दिल्ली व जोधपूर येथे होणार आहे

अशी आहे वंदे भारत स्लीपर एक्स्प्रेस

  • ताशी वेग १६० किलोमीटर

  • एकूण डबे १६

  • प्रवासी क्षमता ८२३

  • प्रत्येक डब्यात छोटी पॅन्ट्री

  • प्रत्येक डब्यात तीन शौचालये

  • एक रेकचा खर्च १२० कोटी रुपये

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Ganeshotsav Traffic Rules: गणेशोत्सवात पुणे मध्यवर्ती भागातील हलक्या मालवाहू वाहनांना पहाटे २ ते सकाळी ११ पर्यंतच लोडिंग-अनलोडिंगची मुभा

Education Alert: शिक्षकांच्या आंदोलनामुळे शाळा बंद राहू नयेत; आरोग्य, बाल विकास, ग्रामपंचायत विभागाला सूचना

1980s AI Photo Trend: ChatGPT वरील एक फोटो पर्यावरणाला पडतोय महागात? व्हायरल AI फोटो 'ट्रेंड'मागचं धक्कादायक वास्तव

VARUN CHAKRAVARTHY: अफगाणिस्तानविरुद्ध भारताच्या विजयाला मोठं ग्रहण! वरुण चक्रवर्ती मालिकेतून बाहेर; एशियन गेम्सही मुकण्याची शक्यता

Road Accident: पोळ रांजणगावजवळ भीषण अपघात; अज्ञात वाहनाच्या धडकेत लासूरगावच्या २५ वर्षीय तरुणाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT