पुणे

मुंबई-बंगळुर ‘वंदे भारत स्लीपर’ पुणे मार्गेच

CD

पुणे, ता. १७ : मुंबई-बंगळुर या बहुचर्चित ‘वंदे भारत स्लीपर’च्या मार्गाबाबत आता स्पष्टता आली आहे. ही रेल्वे पुणे, सोलापूर मार्गावर धावणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. रेल्वे बोर्डातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी नाव न छापण्याच्या अटीवर याला दुजोरा दिला असून महिना ते दीड महिन्यातच ‘वंदे भारत स्लीपर’ प्रत्यक्षात धावेल. याचे तिकिटांचे दर ‘राजधानी’पेक्षा जास्त असणार आहेत.
गेल्या काही दिवसांपासून ‘वंदे भारत स्लीपर’ मिरज, हुबळी मार्गे चालवली जाणार असल्याची चर्चा रेल्वे वर्तुळात सुरू होती. यामुळे पुणे आणि सोलापूर मार्गावरील प्रवाशांमध्ये काहीशी नाराजी होती. मिरज मार्गे ही रेल्वे धावल्यास ‘वंदे भारत’च्या मार्गात अनेक अडचणी निर्माण होण्याची शक्यता होती. तसेच या मार्गावर अपेक्षित असा प्रवाशांचा प्रतिसाददेखील मिळणे अवघड होते. परिणामी रेल्वे बोर्डाने ही रेल्वे पुणे, सोलापूर मार्गानेच चालवण्याचा निर्णय घेतला.

राजधानीपेक्षा सुमारे २० टक्के जास्त तिकिट दर
- ‘वंदे भारत स्लीपर’चे तिकीट दर निश्चित करण्यासाठी प्रति किलोमीटरचा दर ठरवण्यात आला. यात ‘जीएसटी’ अतिरिक्त आकारला जातो. एक हजार किलोमीटरसाठी हे दर ठरवण्यात आले.
- तृतीय वातानुकूलित (थर्ड एसी) : २.४० प्रति किलोमीटर या दराने २ हजार ४०० रुपये.
- सेकंड एसी : ३.१० प्रति किलोमीटर या दराने ३ हजार १०० रुपये.
- फर्स्ट एसी : ३.८० प्रति किलोमीटर या दराने ३ हजार ८०० रुपये.
(हे दर जीएसटी वगळून आहेत)

राजधानी एक्स्प्रेसचे तिकीट दर (१००० किमी प्रवासासाठी)
- थर्ड एसी : सुमारे २.१० ते २.१४ प्रति किलोमीटर दराने अंदाजे २,१०० ते २,१४०.
- सेकंड एसी : सुमारे २.८५ ते २.९१ प्रति किलोमीटर दराने अंदाजे २,८५० ते २,९१०.
- फर्स्ट एसी : सुमारे ३.५३ ते ३.६० प्रति किलोमीटर दराने अंदाजे ३,५३० ते ३,६००.

तिकिट आरक्षणाचे नियम
- या रेल्वेत आरएसी किंवा प्रतिक्षा यादीतील प्रवाशांना प्रवेश नाही. केवळ निश्चित तिकिटावरच प्रवेश.
- ‘वंदे भारत स्लीपर’मध्ये प्रवाशांना किमान ४०० किलोमीटरचे भाडे देणे बंधनकारक असेल. (२०० किमीचा प्रवास असला तरीही ४०० किमीचेच भाडे द्यावे लागेल.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Satara IT Park : कोल्हापूर-साताऱ्यात आयटी पार्कचा मार्ग मोकळा, म्हसवड MIDC साठीही तब्बल 500 कोटी; मंत्री उदय सामंत यांचा मोठा निर्णय

Satara District bank Election : सातारा जिल्हा बॅंक निवडणुकीबाबत मंत्री जयकुमार गोरेंच्या वक्तव्यावर मंत्री उदय सामंत यांचा सावध पवित्रा

Uday Samant : यशवंतराव चव्हाण यांच्या नावाने राज्यात स्वतंत्र अनुवाद समिती स्थापन करणार; मंत्री उदय सामंत यांची घोषणा

वरिष्ठ IAS अधिकारी बेपत्ता, मोबाईही बंद; शेवटचं लोकेशन बंगळुरु विमानतळावर

Nagpur News : नऊ दिवसांपासून नवजात बालिकेच्या शोधात फिरत होती महिला; मुलगी मेल्याने होती अस्वस्थ, रिक्षामधून उडी मारण्याचाही प्रयत्न

SCROLL FOR NEXT