इन्स्पायर अवाॅर्डसाठी
वरद ढगेची निवड
खंडाळा, ता. १६ : असवली येथील संत शिक्षण संस्थेच्या पूज्य बापूजी साळुंखे विद्यालयातील इयत्ता आठवीचा विद्यार्थी वरद लक्ष्मण ढगे याची इन्स्पायर मानक अवॉर्डसाठी निवड झाली आहे. वरद ढगे याने विज्ञान विषयातील अभिनव संकल्पनेवर आधारित प्रकल्प तयार केला आहे. त्याच्या कल्पकतेची व वैज्ञानिक दृष्टिकोनाची दखल घेत या शैक्षणिक वर्षासाठी त्याच्या प्रकल्पाची निवड करण्यात आली. या यशासाठी विज्ञान शिक्षक विकास काकडे यांचे मार्गदर्शन तसेच वैशाली पाटील, दिलीप गावीत, प्रतीक्षा पवार, कल्याणी रांजणे यांचे सहकार्य लाभले. या यशाबद्दल शाळेचे मुख्याध्यापक दत्तात्रय गुरव, वर्गशिक्षक हनुमंत कनप, सर्व शिक्षकवृंद तसेच संत शिक्षण संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी वरदचे अभिनंदन केले.
----------------------------
फाेटाे :...........06062
वरद ढगे
...................................................