loan file photo
पुणे

बँकांकडून विविध कर्ज योजनांची घोषणा; वाचा सविस्तर

दुसऱ्या लाटेच्या पार्श्‍वभूमीवर अर्थव्यवस्थेला आलेली ग्लानी दूर करण्यासाठी या घोषणा करण्यात आल्याचे दिसते.

सम्राट कदम - सकाळ वृत्तसेवा

दुसऱ्या लाटेच्या पार्श्‍वभूमीवर अर्थव्यवस्थेला आलेली ग्लानी दूर करण्यासाठी या घोषणा करण्यात आल्याचे दिसते.

पुणे : ऑक्सिजन प्लांट, वैद्यकीय प्रयोगशाळा, दवाखाना उभारणी आदी वैद्यकीय सुविधा, तसेच कोविडचे उपचार, उद्योग आणि हवाई क्षेत्रासाठी बँकांच्या वतीने विविध कर्जाची घोषणा करण्यात आली आहे. भारतीय स्टेट बँक आणि आय.बी.ए.च्या अध्यक्षांनी रविवारी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून या घोषणा केल्या. इमर्जन्सी क्रेडिट लाईन गॅरंटी स्कीम (ECLGS) मध्ये नवे बदल करण्यात आले असून, त्यात आता परताव्याची मुदत वाढविण्यासह नवीन क्षेत्रांना समाविष्ट करण्यात आले आहे.

दुसऱ्या लाटेच्या पार्श्‍वभूमीवर अर्थव्यवस्थेला आलेली ग्लानी दूर करण्यासाठी या घोषणा करण्यात आल्याचे दिसते. यावेळी एसबीआयचे अध्यक्ष दिनेश कुमार खरा, आयबीएचे अध्यक्ष राजकिरण राय, मुख्य कार्यकारी अधिकारी सुनील मेहता आदी उपस्थित होते. एम.एस.एम.ई.च्या कर्जाची मुदत वाढवणे तसेच नवीन कर्जासाठी प्रावधान करणे आदी उपायोजना यात करण्यात आले आहे. वैद्यकीय क्षेत्रासाठी रिझर्व बँक ऑफ इंडियाने 50 हजार कोटी रुपयांचे लिक्विडीटी फंड उभा केला आहे. रविवारी झालेल्या पत्रकार परिषदेत वैद्यकीय, उद्योग आणि वैयक्तिक स्तरावर उपचारासाठी कर्जाच्या घोषणा करण्यात आल्या आहेत. ३१ डिसेंबर २०२१ पर्यंत या कर्जाच्या सुविधा लागू असणार आहे. ९० दिवसांच्या आत कर्जाची प्रक्रिया पूर्ण केली जाईल असे, खरा यांनी सांगितले.

वैद्यकीय क्षेत्रासाठी :

- ऑक्सिजन प्लांट उभारणीसाठी 2 कोटी रुपयांपर्यंत कर्ज, त्यासाठी 7.5 %व्याजदर, 5 वर्षाची मुदत

- रुग्णालये किंवा वैद्यकीय आस्थापनांना आपत्कालीन बांधकामासाठी कर्ज, बँकेनुसार व्याजदर बदलेल, १० वर्षापर्यंत परतावा अपेक्षित

- निदान केंद्र, पॅथॉलॉजी लॅब, उपचार केंद्र, आदी वैद्यकीय साधने आणि प्रयोगशाळेसाठी कर्ज

कोविड उपचारासाठी कर्ज :

- वैयक्तिक पातळीवर २५ हजार ते ५ लाखापर्यंत कर्ज

- पाच वर्षांचा परतावा अपेक्षित, बँकेनुसार व्याजदर बदलेल.

एम. एस. एम. इ. साठी :

- इमर्जन्सी क्रेडिट लाईन गॅरंटी स्कीम (ECLGS) चा पहिली कर्ज परतावा मुदत वाढवली. ती 45 वरून 60 महिन्यासाठी करण्यात आली.

- नवीन कर्जासाठी अधिक रक्कम उपलब्ध करण्यात येणार

- नागरी उड्डाण क्षेत्राला सहभागी केले.

पुण्यातील आणखी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rajya Sabha: राज्यसभेत ‘एसआयआर’ चर्चेसाठी विरोधकांचा गदारोळ; घोषणाबाजी, सभात्याग आणि अध्यक्षांची तहकूब

Uddhav Thackeray : एकनाथ शिंदेच्या बालेकिल्ल्यातील शिलेदार उद्धव ठाकरेंनी फोडले, ठाण्यातील शिवसैनिकांचा ठाकरे सेनेत प्रवेश

Seed: भारतीय बीज सहकारी समिती २०३३ पर्यंत जगातील टॉप ५ बियाणे उत्पादक कंपन्यांमध्ये स्थान मिळवण्याचा निर्धार; मुरलीधर मोहोळ

Latest Marathi News Live Update : ठाण्यात कायद्याचा धाक उरला आहे का?

Mamata Banerjee: १४ वर्षांत तृणमूल सरकारचा रोजगारनिर्मितीचा दिग्गज आकडा: २ कोटींपेक्षा जास्त लोकांना रोजगार, ममता बॅनर्जीचा दावा

SCROLL FOR NEXT