पाषाण - वारकरी संगीत संमेलनात डॉ. श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते ‘गीत-नृत्य-वाद्य’ पुरस्कार स्वीकारताना  पं. सुरेश गंधर्व. या वेळी सुहास सोनवणे, अनंत ताकवले, पं. यादवराज फड, सुनील पासलकर उपस्थित होते.
पाषाण - वारकरी संगीत संमेलनात डॉ. श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते ‘गीत-नृत्य-वाद्य’ पुरस्कार स्वीकारताना पं. सुरेश गंधर्व. या वेळी सुहास सोनवणे, अनंत ताकवले, पं. यादवराज फड, सुनील पासलकर उपस्थित होते. 
पुणे

वारकरी संमेलनात भक्तीचा संगीताविष्कार

सकाळ वृत्तसेवा

पुणे - ‘महान कलाकार, वीर जवान आणि प्रतिभावंत साहित्यिक देशाला देणाऱ्या महाराष्ट्रात माझा पुरस्कार देऊन सन्मान होतोय, हे माझे भाग्य आहे,’’ अशी भावना दिल्ली येथील इंदूर घराण्याचे प्रख्यात गायक पंडित सुरेश गंधर्व यांनी व्यक्त केले.

संगीतोन्मेष संस्थेतर्फे आयोजित चौदाव्या अखिल भारतीय वारकरी संगीत संमेलनात संमेलनाध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते  त्यांना ‘गीत-नृत्य-वाद्य’ पुरस्कार प्रदान करण्यात आला. या वेळी अनंत ताकवले, सुहास सोनवणे, अनिल ससार, पं. यादवराज फड उपस्थित होते.

सुरुवातीला तरुण गायक सुनील पासलकर यांनी ईशस्तवन, जय जय राम कृष्ण हरी, रूप पाहता लोचनी, जय जय विठ्ठल रखूमाई या पारंपरिक पंचपदीने सुरुवात करून वातावरण भक्तिमय केले. सुरेल, भावपूर्ण गायकीने ‘सादर तुम्ही संत’, ‘काय सांगू देवा ज्ञानोबाची ख्याती’ आणि ‘क्‍या गाऊ कोई सुननेवाला’ ही तुकोबांची हिंदी रचना रंगतदार झाली. श्रवणीय झालेल्या ‘देहूडा चरणी वाजवतो वेणू’ या गवळणीने श्रोते भारावले. त्यानंतर पं. सुरेश गंधर्व यांनी हिंदी संतवाणीने मंत्रमुग्ध केले. ‘मेरो मन अनत कहा सुख पायो’, ‘मन लागो मेरो यार फकिरी में,’ ‘राम को नाम जपलो मनवा’ आणि ‘मोरी नैनन बान पडी’ या रचना सादर केल्या.

संमेलनाची सांगता पं. फड यांच्या गायनाने झाली. त्यांनी ‘संत कृपा झाली इमारत फळा आली’ ही संत बहिणाबाईंची रचना, ‘भजन करी महादेव राम पुजी सदाशिव’ या जनाबाईच्या शिवरंजनी रागातील रचनेने रसिकांना हरी आणि हर यांच्यातील अभेद दर्शविला, ‘तुम्ही विश्वनाथ दिन रंक मी अनाथ’ या रचनेनंतर वारकरी संगीताची महती साधणारी ‘वृंदावनी वेणू कवणाचा माय वाजे’ ही गवळण सादर केली. अविनाश पाटील यांनी तबल्यावर, हार्मोनियमवर माधव लिमये आणि मृदंगावर असाराम साबळे यांनी साथसंगत केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rohit Sharma T20 WC 24 : टी 20 वर्ल्डकप तोंडावर आलाय अन् रोहित पुन्हा फेल गेला... माजी खेळाडूनं व्यक्त केली चिंता

नववधूने तब्येत ठीक नसल्याचं सांगत अंगाला स्पर्श करु दिला नाही, दहाव्या दिवशी दाखवले रंग!

Akshaya Tritiya 2024 : अक्षय्य तृतीयेला उडणार सोने खरेदीला झुंबड, पण सोनं खरं की भेसळयुक्त असं करा चेक!

Lok Sabha Election : नाशिकमधून मोठी बातमी! शांतिगिरी महाराजांचा अर्ज बाद पण...; दिंडोरीमधूनही 5 अर्ज बाद

Adhyayan Suman : बेरोजगारी आणि आलेलं नैराश्य; हिरामंडीतील अभिनेता म्हणाला,"व्यसनाच्या आहारी जाणार होतो पण..."

SCROLL FOR NEXT