Vasant More News Esakal
पुणे

Vasant More : ''एका मर्यादेच्या बाहेर त्रास...'' वसंत मोरे नाराज, पोस्ट करत भावनांना वाट मोकळी करुन दिली

Pune Vasant More News : कायम या ना त्या कारणाने चर्चेत असलेले मनसे नेते वसंत मोरे यांनी मंगळवारी एक पोस्ट करुन उघडपणे नाराजी बोलून दाखवली आहे. त्यांनी फेसबुकवर पोस्ट करत, एका मर्यादेच्या बाहेर त्रास सहन केल्यानंतर माणूस शांत होतो.. असं म्हणत त्यांनी भावनांना वाट मोकळी करुन दिली.

संतोष कानडे

Pune Vasant More News : कायम या ना त्या कारणाने चर्चेत असलेले मनसे नेते वसंत मोरे यांनी मंगळवारी एक पोस्ट करुन उघडपणे नाराजी बोलून दाखवली आहे. त्यांनी फेसबुकवर पोस्ट करत, एका मर्यादेच्या बाहेर त्रास सहन केल्यानंतर माणूस शांत होतो.. असं म्हणत त्यांनी भावनांना वाट मोकळी करुन दिली.

लोकसभा निवडणुकांसाठी दोन-तीन दिवसांमध्ये आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे. त्यातच वसंत मोरे यांच्या पोस्टमुळे मनसे पक्षातली अंतर्गत गटबाजी उघड झाली आहे. आपल्याला कुणाकडूनही अपेक्षा नाहीत, असं म्हणत वसंत मोरे यांनी खेद व्यक्त केला आहे.

वसंत मोरे यांची फेसबुक पोस्ट

''एका मर्यादेच्या बाहेर त्रास सहन केल्यानंतर माणूस खूप शांत होतो...

त्यानंतर ना कोणाकडे तक्रार कतो, ना कोणाकडून अपेक्षा ठेवतो...''

अशी पोस्ट मनसे नेते वसंत मोरे यांनी केली आहे. त्यांची ही पोस्ट व्हायरल झाली असून ते काही वेगळा निर्णय घेणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

मागच्या काही वर्षांपासून वसंत मोरे यांची नाराजी लपून राहिलेली नाही. काही वेळा जाहीरपणे, काहीवेळा अंतर्गत तर कित्येकदा सोशल मीडियातून त्यांची नाराजी उघड झालेली आहे. एवढं सगळं होऊनही त्यांनी राज ठाकरे यांची साथ कधी सोडलेली नाही.

येणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी वसंत मोरे राज ठाकरेंवर निष्ठा कायम ठेवतात की अंतर्गत गटबाजीला कंटाळून निर्णय बदलतात, हे बघणंही महत्त्वाचं आहे. पुण्यामध्ये वसंत मोरे यांच्या सामाजिक कार्याची कायम चर्चा असते. त्यामुळे त्यांना मानणारा मोठा वर्ग पुण्यात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold-Silver Rate Today: सोनं-चांदीच्या भावात मोठी घसरण! 11 सप्टेंबरला पुन्हा दर कोसळणार? जाणून घ्या ताजी अपडेट

‘त्याला माझी इनसिक्युरिटी वाटायची’; अनेक वर्षांनंतर नीना गुप्तांनी उघड केलं गुपित, म्हणाल्या...'माझ्यापेक्षा जास्त...'

ChatGPT's 80s Photo Trend: Instagram वर व्हायरल होतोय 'ChatGPT ’80s Photo Trend'; 'हा' सोपा प्रॉम्प्ट वापरून तयार करा तुमचा ८० च्या दशकातील रेट्रो लूक!

Marathi News Live Updates : लातूर जिल्ह्यात कोरडा दुष्काळ; शेतकऱ्यांच्या स्वप्नांची माती, मायबाप सरकारला आर्त हाक

Share Market Today: इराणच्या अमेरिकेला धमकीने शेअर बाजार कोसळला! सेन्सेक्स 500 अंकांनी खाली; कोणत्या शेअर्सला मोठा फटका?

SCROLL FOR NEXT