vasunde malekar murder case shocking reason of accused of killing police investigation Sakal
पुणे

Baramati News : वासुंदे-मळेकर खुन प्रकरणाचा छडा; आरोपीकडुन धक्कादायक कारण...

पाटस-बारामती पालखी मार्गावर वासुंदे (ता.दौंड) हद्दीत घडलेल्या बॅंकेचे वसुली एजंट प्रविण मळेकर खुन प्रकरणातील आरोपीचा शोध लावण्यात दौंड पोलिस व स्थानिक गुन्हे शाखेला यश आले.

अमर परदेशी

पाटस : पाटस-बारामती पालखी मार्गावर वासुंदे (ता.दौंड) हद्दीत घडलेल्या बॅंकेचे वसुली एजंट प्रविण मळेकर खुन प्रकरणातील आरोपीचा शोध लावण्यात दौंड पोलिस व स्थानिक गुन्हे शाखेला यश आले.मात्र,तपासात आरोपीकडुन खुनाचे मिळालेले धक्कादायक कारण ऐकून अनेकांच्या भुवया उंचावल्या.रस्त्याने जाणाऱया वाहनांच्या आवाजाचा त्रास होतोय म्हणुन आरोपीने अनओळखी दुचाकीस्वराला अडवुन त्याचा खुन केला असल्याचे पोलिसांनी सांगितले.

दिपक रामदास लोंढे (वय ३७) रा.वासुंदे ता.दौंड जि.पुणे असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. पुणे येथील प्रविण मळेकर हे बॅंकेचे खासगी वसुली एजंटचे काम करत होते.ते बारामतीला एका बॅंकेचे वसुली नोटीस देण्यासाठी गेले होते.दिवसभर काम ओटोपल्या नंतर सायंकाळी ते बारामती-पाटस पालखी मार्गाने पुण्याकडे निघाले होते.

रात्री पावणे आठच्या सुमारास ते वासुंदे हद्दीत येताच कोणीतरी व्यक्तीने त्यांच्या पोटात धारदार सुरा भोकसला.मळेकर यांचा उपचारापुर्वीच मृत्यू झाला होता. या प्रकरणी यवत पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव व स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिस पथकाने तपासाची सुत्र हलविले.यावेळी परीसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले.त्यानुसार पोलिसांनी श्वान पथकही पाचारण केले.

तसेच स्थानिक चौकशीत परीसरातील एका जणाकडुन रस्त्याने जाणाऱया वाहनांवर अनेकदा दगड फेकीचा प्रकार घडल्याची माहीती पोलिसांना मिळाली.काही तासात संशयीत आरोपी दिपक लोंढे यास ताब्यात घेतले.पोलिस चौकशीत आरोपीकडुन खुनाचे धक्कादायक कारण समोर आले असल्याचे पोलिसांनी सांगितले.

रस्त्यावरील ये-जा करणाऱया वाहनांचा त्रास होतो म्हणुन आरोपी दिपक लोंढे याने कृत्य केले. रस्त्याने जाणाऱया मळेकर यांच्यावर तिक्ष्ण हत्याराने वार केला.त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला.लोंढे यावर यापुर्वीही एका महीलेला शस्त्राचा धाक दाखविल्याचा गुन्हा दाखल आहे.

दरम्यान, या प्रकरणी पुणे ग्रामीण पोलिस अधिक्षक पंकज देशमुख, अप्पर पोलिस अधिक्षक संजय जाधव,दौंड उपविभागीय पोलिस अधिकारी स्वप्नील जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अविनाश शिळीमकर,दौंड पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव,सहायक पोलिस निरीक्षक राहुल गावडे यांच्यासह आदी पोलिस पथकाने ही कामगिरी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Team India : अजित आगरकरची शेवटची मिटींग अन् रोहित शर्माच्या भविष्याचा फैसला; नेमकं काय शिजतंय? उद्याचा दिवस महत्त्वाचा

Woman biker hit and run: महिला रायडरला धडक देणारा कारचालक नेमका कोण? राजस्थानमधून केली अटक, व्हिडीओ झाला होता व्हायरल

राष्ट्रपतींचे माजी ADC मेजर ऋषभ सिंह संब्याल यांनी घेतली ३०व्या वर्षी निवृत्ती; १२ वर्षांच्या सेवेनंतर किती पेन्शन मिळणार?

ZIM vs AUS : सचिन तेंडुलकरचा 'तो' विक्रम, आता त्याचा राहीला नाही! झिम्बाब्वेच्या ब्रेंडन टेलरचा वन डे क्रिकेटमध्ये मोठा पराक्रम

US Student Visa Update: भारतीय विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! डोनाल्ड ट्रम्प यांच्या चार वर्षांच्या व्हिसा नियमांना स्थगिती

SCROLL FOR NEXT