पुणे

रामानंद संप्रदाय सेवा-समिती सोलापूर

CD

वसुंधरा दिंडीचा सोलापुरात मुक्काम
जागतिक तापमानवाढीविरोधात जनजागृती; वृक्षारोपणासह पाच किलोमीटर दिंडीत सहभागी होण्याचे आवाहन

सकाळ वृत्तसेवा
सोलापूर, ता. ५ : वसुंधरा संवर्धन आणि जागतिक तापमानवाढीविरोधात जनजागृतीचा संदेश घेऊन जगद्‍गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्य (दक्षिणपीठ नाणीजधाम) यांच्या प्रेरणेने नाणीजधामकडे निघालेल्या ‘वसुंधरा पायी दिंडी’चा सोलापुरात ५ व ७ ऑक्टोबरला मुक्काम होणार आहे. नाणीजधाम येथे २१ ऑक्टोबरला जगद्‍गुरूंच्या जन्मोत्सवानिमित्त कार्यक्रम होणार आहे. सोलापूरकरांनी किमान पाच किलोमीटर दिंडीसोबत चालून या सेवाभावी उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन रामानंद संप्रदाय उत्तर सोलापूर सेवा समितीने केले आहे.
उपपीठ नागपूर येथून निघालेली दिंडी सोमवारी (५ ऑक्टोबर) सायंकाळी लक्ष्मीतरु गार्डन, शिवाजीनगर, बाळे येथे मुक्कामी येणार आहे. येथे श्रींच्या सिद्ध पादुकांचे दर्शन तसेच महाप्रसादाचा लाभ भक्तांना घेता येणार आहे. उपपीठ तेलंगणा येथून निघालेली दिंडी बुधवारी (७ ऑक्टोबर) सोलापुरात येणार असून, तिचाही लक्ष्मीतरु गार्डन येथे मुक्काम राहणार आहे. या वेळीही सिद्ध पादुकांचे दर्शन व महाप्रसादाची व्यवस्था केली आहे.
-------------------------------
मुक्कामाच्या ठिकाणी वृक्षारोपण
दिंडीच्या प्रवासातील विविध विश्रांती व मुक्कामाच्या ठिकाणी वृक्षारोपण केले जात आहे. जागतिक तापमानवाढीबाबत जनजागृतीसोबतच अध्यात्मिकतेतून सामाजिक प्रबोधनाचा संदेश देण्यात येत आहे. नागरिकांनी या जनहितार्थ सेवाभावी कार्यात सहभागी होऊन दिंडीसोबत किमान पाच किलोमीटर अंतर चालावे, असे समितीने आवाहन केले आहे. अधिक माहितीसाठी नरसिंग संगनाळे (९६७३५५४६०६), दिगंबर आवताडे (९९२१६५१०५०) यांच्याशी संपर्क साधावा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hingoli Fire Tragedy : हिंगोलीत फटाक्यांच्या गोदामाला भीषण आग; महिला आणि मुलासह दोघांचा मृत्यू, नगर परिषदेचे कर्मचारी गंभीर भाजले!

Viral Video : 'डोकंच नाहीये काही...' ईशान किशनचा रात्री १ वाजता विमानतळावर पारा चढला, नेमकं काय घडलं?

Latest Marathi News Live Update : राज ठाकरे MPSC आंदोलकांच्या भेटीसाठी पुण्यात दाखल

Sangli Crime : सांगलीत रेकॉर्डवरील गुन्हेगाराचा कोयत्याने वार करून निर्घृण खून; गोकुळनगरात थरार

Mangalwedha News : भाजप युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश महामंत्री पदी सुदर्शन यादव यांची निवड

SCROLL FOR NEXT