पुणे

बारामतीच्या वसुंधरा वाहिनीस राज्यात प्रथम क्रमांक

महाराष्ट्रातील सर्व कम्युनिटी रेडिओंच्या कार्यक्रमांच परीक्षण करून ऑनलाईन पारितोषिक वितरण समारंभ नुकताच झाला.

मिलिंद संगई,

महाराष्ट्रातील सर्व कम्युनिटी रेडिओंच्या कार्यक्रमांच परीक्षण करून ऑनलाईन पारितोषिक वितरण समारंभ नुकताच झाला.

बारामती - युनिसेफ आणि सेंटर फॉर सोशल अँड बिहेविअर चेंज कम्युनिकेशन यांच्या वतीने कोरोना जनजागृतीसाठी (Corona Awareness) महाराष्ट्रातील कम्युनिटी रेडिओसाठी (Community Redio) घेण्यात आलेल्या स्पर्धेत (Competition) येथील विद्या प्रतिष्ठान संचलित वसुंधरा वाहिनीने (Vasundhara Channel) राज्यात प्रथम क्रमांक प्राप्त केला.

रेडीओद्वारे कोविड जनजागृतीसाठी विशेष मोहीम सुरु करून कोविड उपचार, आहार, कोविड काळातील समस्या आणि उपाय, महिला, युवक, गरोदर माता, बालके यांच्या आरोग्यासाठी ‘आमची उर्मिला’ या जनजागृतीपर कार्यक्रमांची मालिका वसुंधरा वाहिनीवरून प्रसारित करण्यात आली.

महाराष्ट्रातील सर्व कम्युनिटी रेडिओंच्या कार्यक्रमांच परीक्षण करून ऑनलाईन पारितोषिक वितरण समारंभ नुकताच झाला. युनिसेफ महाराष्ट्राच्या प्रमुख राजेश्वरी चंद्रासेकर यांनी विजेत्या कम्युनिटी रेडीओंची नावे जाहीर केली. या कार्यक्र्मासाठी सेंटर फॉर सोशल अँड बिहेविअर चेंज कम्युनिकेशनचे व्यवस्थापकीय संचालक निशीत कुमार, युनिसेफ़ महाराष्ट्राच्या अल्पा वोरा, सोनाली मुखर्जी, स्वाती महोपात्रा, सल्लागार सरिता संकरण, कार्यक्रम प्रमुख पूजा यादव आणि महराष्ट्रातील सर्व कम्युनिटी रेडिओचे संचालक हे या ऑनलाईन कार्यक्रमास उपस्थित होते.

कोरोना सारख्या संकटाना तोंड देण्यासाठी शासन आणि जनसामान्यांना जोडणारा पूल म्हणून काम करत असल्याने वसुंधरा वाहिनीला हे यश मिळवता आल्याचे मत विद्या प्रतिष्ठानच्या विश्वस्त सुनेत्रा अजित पवार यांनी व्यक्त केले.

विद्या प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष अॅड. अशोक प्रभुणे, सचिव अॅड. नीलिमा गुजर, खजिनदार श्री युगेन्द्र पवार, विश्वस्त किरण गुजर, डॉ. आर.एम. शहा, मंदार सिकची, तसेच व्ही.आय.आय.टी.चे संचालक डॉ. आनंद देशमुख, संजय जगताप यांनी प्रोत्साहन दिले. युनिसेफच्या माध्यमातून कम्युनिटी सोबत काम करताना खऱ्या अर्थान कम्युनिटी रेडिओचा उद्देश साध्य होत असल्याचे वसुंधरा वाहिनीच्या केंद्र प्रमुख आशा मोरे यांनी सांगितले.

आर.जे. स्नेहल कदम, आणि ऋतुजा आगम, यांनी कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी परिश्रम घेतले. कार्यक्रमामध्ये सायली कासार, अक्षय कांबळे, अवंतिका वाबळे यांनी सहभाग घेतला. लेखन रवींद्र गडकर, माधवी गोडबोले, यांनी केले. संदीप दानवले यांचे सहकार्य लाभले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Child Accident : पुण्यात भीषण अपघात! भरधाव कारने ६ दुचाकी, रिक्षाला उडवले; ४ वर्षांच्या मुलाचा मृत्यू

Akole Crime: अकोले तालुक्यात खळबळ! पाकिस्तानी ॲप कनेक्शनच्या संशयावरून चौकशी, एक चूक नडली अन् नेमकं काय घडलं..

Aditi Tatkare Mumbai Goa highway : मुंबई -गोवा महामार्गावरील टोल वसुलीला अदिती तटकरेंचा तीव्र विरोध, नितीन गडकरींची घेणार भेट

विकीच्या वाढदिवसादिवशी कतरिनाने शेअर केला विहान फोटो, विकीला म्हणाली, 'तुला शांतपणे ब्लॅक कॉफी पिण्यासाठी...' Post Viral

अश्या प्रकारच्या जल्लोष करण्यावर थेट बंदी घाला! अंबाती रायडू आयपीएलमधील 'त्या' ट्रेंडवर प्रचंड संतापला

SCROLL FOR NEXT