केडगाव : नारायण बेट येथील दत्त संस्थान व चौफुला येथील बोरमलनाथ गोशाळेत वसुबारसचा सण उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त गोशाळा सजवून गोपूजन, यज्ञ व विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
देऊळगाव गाडा (ता. दौंड) येथील नारायण बेट येथे सकाळी पराग इनामदार यांच्या हस्ते गोपूजन व गोयज्ञ झाला. श्रीमहागणेश अधिष्ठान विश्वस्त न्यासातर्फे सेवेकऱ्यांना दिवाळी भेट देण्यात आली, तर नारायण महाराज प्रासादिक दिंडीच्या वतीने विश्वस्तांचा सन्मान करण्यात आला. सायंकाळी साडेसहा वाजता गायींचे औक्षण करण्यात आले. वसुबारसनिमित्त गायींना रंग, फुगे व झूल लावून सजविण्यात आले होते. रात्री आठ वाजता दत्त महाराज यांच्या पालखी सोहळ्याने उत्सवाची सांगता झाली. यावेळी प्रमुख विश्वस्त संजय शितोळे, डॉ. मोहन चौधरी, धार्मिक विभाग प्रमुख मोरेश्वरबुवा जोशी चऱ्होलीकर उपस्थित होते.
चौफुला येथील बोरमलनाथ गोशाळेत गायत्री यज्ञ करण्यात आला. त्यानंतर गाईंचे औक्षण करून त्यांना गूळ-पोळीचा नैवेद्य देण्यात आला. देवस्थानच्या वतीने ग्रामस्थांना मिठाई वाटप करण्यात आले. दिव्या रोकडे हिने आकर्षक रांगोळी काढली होती. यावेळी निवृत्त जिल्हा न्यायाधीश दिलीप देशमुख, भाजपच्या कांचन कुल, डॉ. वंदना मोहिते, उद्योजक विपुल पटेल, सोमनाथ गडधे, अर्जुन पटेल, गंगाधर पटेल आदी उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.