पुणे

कऱ्हाडः शिक्षण मंडळ कराडच्या "लाहोटी कन्या प्रशालेची" माजी विद्यार्थिनीस चार पदके

CD

कऱ्हाडच्या वेदांतिकाची सुवर्णभरारी

चार पुरस्कारांवर उमटविले नाव; राष्ट्रपतींकडून सन्मान

कऱ्हाड, ता. २ ः लाहोटी कन्या प्रशालेची माजी विद्यार्थिनी वेदांतिका बाळासाहेब देसाई हिने शिलाँग येथील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजीमधून (एनआयएफटी) ज्वेलरी डिझाईनमधील बॅचलर ऑफ डिझाईन पदवी संपादन करत यश मिळविले. तिने एकाच वेळी चार पुरस्कार पटकावून शिलाँगच्या केंद्रात सर्वाधिक पुरस्कार मिळविणारी एकमेव विद्यार्थिनी होण्याचा मान पटकाविला.

२०२२-२६ या बॅचचा दीक्षांत कार्यक्रम नुकताच दिल्ली येथे झाला. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू व केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री गिरिराज सिंह यांच्या उपस्थितीत वेदांतिकाला एनआयएफटी बेस्ट ॲकॅडमिक फरफॉर्मन्स अवॉर्ड अंतर्गत सुवर्णपदक, प्रमाणपत्र व ११ हजार रुपयांचा धनादेश देऊन गौरविले. तिने अन्य तीन पुरस्कारही मिळविले. देशभरातील १८ एनआयएफटी केंद्रांतून दरवर्षी सुमारे चार हजार विद्यार्थी पदवीधर होतात. त्यापैकी निवडक विद्यार्थ्यांना सुवर्णपदकाने गौरविले जाते.
वेदांतिका ही २०१९-२० च्या दहावीच्या बॅचची विद्यार्थिनी आहे. तिच्या यशाबद्दल शिक्षण मंडळाचे सचिव चंद्रशेखर देशपांडे, उपाध्यक्ष अनघा परांडकर, आयपीएस तुषार देसाई, माजी प्राचार्य गणपतराव कणसे, मुख्याध्यापिका हेमलता जंगम यांच्यासह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले.


46569
नवी दिल्ली ः पुरस्कार व पदकांसमवेत वेदांतिका देसाई.
----------------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Krishnaraj Mahadik : मनसेच्या चोरांना भाजपच्या पोरांनी जशास तसं प्रत्युत्तर दिलं, भाजप युवा नेते कृष्णराज महाडिकांची मनसेला वॉर्निंग

Jalgaon Bypass Flyover Collapse : खर्च वाचविण्यासाठी वाहनधारकांच्या जिवाशी खेळ; अपघातांमागे 'बायपास'चे निकृष्ट काम; कंत्राटदारावर थेट गुन्हा दाखल

OBC Creamy Layer : केंद्र सरकारला झटका ! ओबीसी क्रिमी लेयरवर सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; UPSC सह १८ राज्यांतील भरतीवर परिणाम?

होलसेल बदलामागचं लॉजिक काय? Shahid Afridi ने पाकिस्तान संघाचे वाभाडे काढले; म्हणाला, ट्वेंटी-२० तील खेळाडू कसोटी संघात...

Marathi News Live Updates : वडिगोद्री येथे सोलापूर-धुळे राष्ट्रीय महामार्गावर रस्ता रोको; मराठा समाज बांधव आक्रमक

SCROLL FOR NEXT