purandar sakal
पुणे

पुणे : वीरला आढळला डेल्टा प्लसचा रुग्ण

समगीर वस्तीमध्ये नागरिकांची आरोग्य तपासणी

सकाळ वृत्तसेवा

परिंचे : श्री क्षेत्र वीर (veer) (ता. पुरंदर) येथे समगीर वस्ती येथील एका कोरोनाबाधित रुग्णाचा अहवाल पुण्यातील (pune) राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेकडून (ICMR) डेल्टा प्लस पॉझिटिव्ह आला आहे. आरोग्य विभागामार्फत संपूर्ण वस्तीचे सर्वेक्षण करण्यात आले असल्याचे वैद्यकीय अधिकारी डॉ. स्वप्नाली शिंदे यांनी सांगितले. येथील रुग्णाचा अहवाल एक महिना उशिरा

आल्याने प्रतिबंधात्मक उपाय करणे अवघड झाले असून ग्रामपंचायतीच्या वतीने निर्जंतुकीकरण व धूर फवारणी करण्यात आली असल्याचे सरपंच माऊली वचकल यांनी सांगितले. समगीर वस्ती येथील एक कुटुंब भोंगवली (ता. भोर) येथे पाहुण्यांकडे गेले असता त्यांना थंडी, ताप व सर्दी झाल्यामुळे तेथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल केले. यात पतीचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्यामुळे उपचारासाठी भोर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. त्यावेळी त्यांच्या पत्नीची देखील कोरोना चाचणी व डेल्टा प्लसची चाचणी करण्यात आली होती.

त्या तपासणीमध्ये त्यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला होता. या घटनेला तब्बल एक महिना उलटून गेला आहे. परिंचे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात अचानक डेल्टा प्लसचा तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आल्याचे सांगण्यात आले. आरोग्य विभागाचे पथक रुग्णांच्या घरी पोचले असता रुग्ण महिला शेतात काम करीत होती. महिलेसह संपूर्ण कुटुंब ठणठणीत असल्याचे ग्रामपंचायत सदस्य आत्माराम समगीर यांनी सांगितले.

नागरिकांनी घाबरू नये

आरोग्य विभागामार्फत सर्वेक्षण चालू अाहे. डेल्टा प्लस विषाणू संदर्भात संशोधन सुरू असून यामध्ये कोणताच धोका नसल्याने नागरिकांनी घाबरून जाऊ नये, असे आवाहन आरोग्य विभागामार्फत तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. उज्ज्वला जाधव यांनी केले आहे.

रुग्णाने प्राथमिक आरोग्य केंद्र भोंगवली येथे कोविड तपासणी केल्याने व पत्ता सारोळा (ता. भोर) येथील दिल्याने पुरंदर तालुका आरोग्य विभागास अहवाल मिळण्यास विलंब झाला.

- डॉ. स्वप्नाली शिंदे, वैद्यकीय अधिकारी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mandangad Ghat Reopens : मुंबई, पुणे अन् महाडला जाणाऱ्यांसाठी मोठी बातमी! अखेर 'हा' महत्त्वाचा घाटमार्ग 4 दिवसांनंतर वाहतुकीसाठी खुला; मंडणगड-दापोलीचा संपर्कही पूर्ववत

Nagpur: नागपूर-बडनेरा रेल्वेमार्गावर ‘एबीएस सिस्टिम’; ऑटोमॅटिक सिग्नलिंगने वाढणार वेग; १७५ किमीचा मार्ग जानेवारीपर्यंत पूर्ण होणार

Latest Marathi News Live Update : जेजुरीत भीषण अपघात; ट्रकच्या धडकेत तीन वारकऱ्यांचा मृत्यू, सहा वारकरी जखमी

'मला त्या अदृश्य हातांची आठवण येतेय' किमोथेरिपी झाल्यानंतर मेधा मांजरेकरांची भावुक पोस्ट, म्हणाल्या...

Chhatrapati Sambhajinagar: म्हणे, मी त्याची पत्नी नाही; त्या खोलीत प्रवेशही नव्हता; बाबा फर्जन याच्या बंगल्यावरील कारवाई प्रकरणात अटकेतील महिलेचा एकाच दिवसात यू-टर्न

SCROLL FOR NEXT