पुणे

पालेभाज्यांचे दर वधारले , फळ भाज्यांच्या दरात ही सुधारणा , किरकोळ बाजारात कोथिंबीर पंचवीस तर मेथीची पेंढी वीस रुपये ''

CD

फळभाज्या व पालेभाज्यांचा संग्रहित फोटो वापरावा.
---
वाढत्या उन्हामुळे कडाडले पालेभाज्यांचे दर
पुरुषोत्तम मासामुळे मागणी वाढणार; दर आणखी भडकण्याची शक्यता
सकाळ वृत्तसेवा
उ. सोलापूर, ता. १८ : वाढलेल्या उन्हामुळे बाजारात भाजीपाल्याची आवक घटली असून, त्याचा थेट परिणाम दरावर झाला आहे. कोथिंबीर, मेथीसह इतर पालेभाज्यांच्या दरात मोठी सुधारणा झाली आहे. गेल्या चार महिन्यांपासून मंदीचा सामना करणाऱ्या फळभाज्यांच्या दरातही वाढ झाली असून वांगी, दोडका यांच्या किमती सुधारल्या आहेत. पुरुषोत्तम मासानिमित्त आहार पद्धतीत होणाऱ्या बदलामुळे भाजीपाल्याच्या दरात आणखी वाढ होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
सूर्यदेवाच्या प्रकोपामुळे भाजीपाला उत्पादनात मोठी घट झाली आहे. एरव्ही सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात दररोज जवळपास दहा हजार पेंड्यांहून अधिक विक्री होणाऱ्या मेथीची आवक सध्या निम्म्यावर आली आहे. त्याचबरोबर पालक, शेपू या पालेभाज्यांचे दरही वाढले आहेत. पालेभाज्यांसोबत फळभाज्यांच्या दरातही मोठी वाढ झाली आहे.
बाजारात वांग्याची आवक घटल्यामुळे वांग्याच्या दरात गत महिन्याच्या तुलनेत प्रति दहा किलोमागे ४० ते ५० रुपयांची वाढ झाली आहे. तसेच घेवडा, ढोबळी मिरची, गाजर आणि बीट यांच्या दरांतही मोठी वाढ झाली आहे.
रविवारपासून पुरुषोत्तम म्हणजेच अधिक मासास सुरवात झाली आहे. या महिन्यात हिंदू बांधव मांसाहारी अन्नपदार्थांचे सेवन टाळत असल्याने भाजीपाल्याची मागणी वाढते. त्याचा थेट परिणाम दरावर होणार असून, येत्या महिनाभरात पालेभाज्या आणि फळभाज्यांचे दर आणखी वाढण्याची शक्यता आहे.
अति उष्णतेमुळे पालेभाज्यांचे अंकुरण कठीण झाले आहे. तसेच फळभाज्यांच्या पिकांवरही तीव्र उष्णतेचा विपरीत परिणाम झाला आहे. त्यामुळे येत्या काळात उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता असून, मागणीत वाढ आणि उत्पादनात घट या व्यस्त प्रमाणामुळे दर विक्रमी पातळीवर जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
---
चौकट
पालेभाज्यांचे दर (प्रति शेकडा पेंडी)
कोथिंबीर : १०००-१८००
मेथी : १०००-१६००
पालक : ६००-८००
शेपू : १२००-१५००
----
फळभाज्यांचे दर (प्रति १० किलो)
वांगी : १३०-३००
टोमॅटो : १८०-३००
घेवडा : ४५०-४५०
ढोबळी मिरची : ३००-४५०

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Playoff Scenario: १७ चेंडूंत ८८ धावांचं वादळ... वैभव सूर्यवंशीची विक्रमी खेळी अन् RR ची Point Table मध्ये उलथापालथ

Parth Pawar Clarification : प्रशांत किशोर राष्ट्रवादीसाठी काम करणार? पार्थ पवारांनी दिले स्पष्टीकरण; 'ही केवळ स्नेहभेट'

RR vs LSG Live: वैभव सूर्यवंशीने मोठा विक्रम मोडला; फिफ्टीनंतर 'A' सेलिब्रेशनची रंगलीय चर्चा... नेमका त्याचा अर्थ काय? Video Viral

Tukaram Mundhe Transfer : तुकाराम मुंढे यांची पुन्हा बदली; २१ वर्षांत तब्बल २५ बदल्या, आता नवी जबाबदारी

राज्यात फक्त एक महिना पुरेल इतकाच इंधनसाठा...छगन भुजबळ यांच्या विधानानं खळबळ, नेमकं कायम म्हणाले?

SCROLL FOR NEXT