Vegetable sellers house burnt in fire at kalewadi rautagar 
पुणे

भाजी विकणाऱ्याच्या घराला आग; छोट्या रस्त्यामुळं अग्नीशमनची गाडी पोहोचलीच नाही

सकाळवृत्तसेवा

कोथरुड(पुणे) : केळेवाडीमधील राऊतवाडी येथे राहणाऱ्या तुकाराम क्षीरसागर यांच्या घराला आग लागून घरातील सर्व चीज वस्तू जळून खाक झाल्या. सुदैवाने जीवीत हानी झाली नाही. क्षिरसागर हे सायकल वरून घरोघरी जाऊन भाजी विकण्याचा व्यवसाय करतात. सकाळी त्यांच्या घरातून अचानक धुर येवू लागला. सतर्क झालेल्या लोकांनी नगरसेवक दिपक मानकर यांच्या कार्यालयात संपर्क केला. दिलीप कानडे यांनी अग्निशमन दल व विद्युत विभागाला सदर घटनेची माहिती दिली. केळेवाडी भागातील रस्ते अरुंद असल्याने अग्निशमन दलाची गाडी येथे पोहचू शकली नाही.

दरम्यान, जवान, पोलिस, दिवा प्रतिष्ठानचे कार्यकर्ते व स्थानिक रहीवाशी पुनाराम चौधरी, राम वाशिवले, धोंडु बोडेकर, सागर पासलकर, विठ्ठल मारणे, सुशिल भोसले, हनुमंत मरगळे, महेश चाकणकर, गणेश चाकणकर, अनिकेत खळदकर, वैभव खोचडे, सुनील वडवेराव, दत्ता गायकवाड, अरुण भिलारे, शाम कोंढरे, भूषण शिर्के आदींच्या प्रयत्नांमुळे आग शमविण्यात यश आले.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

घरात असलेल्या गिझरमुळे आग लागल्याचा अंदाज आहे. स्थानिक लोकांनी वेळीच आग अटोक्यात प्रयत्न केला नसता तर आग पसरुन मोठी हानी होण्याचा धोका झाला असता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Cyber Fraud Alert : ना लिंक, ना ओटीपी! पण मिनिटांत बँक अकाऊंट खाली, नेमका फ्रॉड आहे तरी काय? ज्याने वाढवले देशाचे टेन्शन

Uttrakhand : ‘स्वदेशी अपनाओ, राष्ट्र को आगे बढ़ाओ’, मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांचा नारा; देहरादूनमध्ये आयोजित अभियानाचे नेतृत्व केले

हाऊ रोमँटिक! अर्जुनने गुढघ्यावर बसून सायलीला केलं प्रपोज, म्हणाला, 'सात नाहीतर सत्तर जन्म मला सायलीच पाहिजे'

8th pay commission: आठव्या वेतन आयोगात मोठे बदल; सरकारी कर्मचाऱ्यांच्या आरोग्य सुविधेबाबत होणार वेगळा निर्णय?

Ganeshotsav 2025: २६७ किलो सोने, ३५० किलो चांदी, ७० वर्षांची परंपरा अन्...; 'या' गणपतीची श्रीमंती पाहून भाविक थक्क

SCROLL FOR NEXT