पुणे

शहरातील गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये रास्त दरात ताजा भाजीपाला आणि फळे 

सकाळवृत्तसेवा

पुणे - लॉकडाउनच्या कालावधीत शहरातील गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये रास्त दरात ताजा भाजीपाला आणि फळे पोचवण्यासाठी सहकार व पणन विभागाने उपक्रम सुरू केला आहे. गेल्या आठवडाभरात शहराच्या मध्यवर्ती भागातील सुमारे अडीचशे सोसायट्यांमधील 26 हजारांहून अधिक सभासदांनी या सुविधेचा लाभ घेतला आहे. 

स्वच्छ व ताजा भाजीपाला सोसायटीच्या आवारात उपलब्ध व्हावा, या हेतूने शेतकरी आणि शेतमाल उत्पादक कंपन्या महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ यांच्यामार्फत उपलब्ध करून देत आहेत. कोथरूड येथील हॅप्पी कॉलनी येथील स्वरूपछाया, कर्वेनगर येथील गोल्डन पेटल्स यासह अन्य सोसायट्यांच्या आवारातच भाजीपाला मिळण्याचे नियोजन केले. सोसायट्यांमध्ये ग्राहकांना भाजीपाला आणि फळे उपलब्ध करून देण्यासाठी श्री स्वामी समर्थ फार्मर्स प्रोड्युसर कंपनीचे नरेंद्र पवार, अक्काबाई अॅग्रीकल्चरचे नीलेश रायकर, शेतकरी अमोल जाधव, प्रसाद खैरे यांच्यासह शेतकरी आणि शेतमाल उत्पादक कंपन्या पुढे आल्या आहेत. 

पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

खरेदीसाठीचे नियम 
- भाजीपाला खरेदीसाठी एका कुटुंबातून एकच व्यक्ती 
- प्रत्येकाने तोंडाला मास्क अथवा रुमाल बांधणे गरजेचे 
- सोशल डिस्टन्सिंग नियमांचे पालन आवश्यक 
- आखून दिलेल्या जागेतच उभे राहून खरेदी 
- आठवडाभर पुरेल इतका भाजीपाला खरेदी करावा. 

भाजीपाला उपलब्ध करून देण्यासाठी शेतकरी आणि गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये समन्वय साधून नियोजन करण्यात येत आहे. सहकार व पणन विभाग थेट शेतकऱ्यांकडून सोसायटीला भाजीपाला पुरवठा करण्यासाठी प्रयत्नशील आहे. या उपक्रमामुळे शेतमालाचे नुकसान होणार नाही. तसेच, ग्राहकांनाही योग्य दरात भाजीपाला उपलब्ध होत आहे. 
- दिग्विजय राठोड, उपनिबंधक, सहकार विभाग 

नागरिकांनी भाजीखरेदीसाठी दूरवर जाण्याची आवश्यकता नाही. या उपक्रमाला सोसायट्यांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. 
- नरेंद्र पवार, व्यवस्थापक, श्री. स्वामी समर्थ फार्मर्स प्रोड्युसर्स कंपनी 
 

सहकार व पणन विभागातील अधिकाऱ्यांच्या प्रयत्नातून सोसायटीमधील सभासदांना योग्य दरात ताजा भाजीपाला मिळणे शक्य झाले आहे. इतर सोसायट्यांनीही या सुविधेचा लाभ घ्यावा. 
- सौरभ घोडके, माणिकशेठ दुधाने, गोल्डन पेटल्स सोसायटी, कर्वे रस्ता. 
 

येथे साधा संपर्क 
------------------- 
संकेतस्थळ www.mcdc.com 
ई-मेल आयडी 
hopune@mahamcdc.com आणि 
mcdcpune@gmail.com 

दूरध्वनी क्रमांक : 
020- 29809408 
मोबाईल : दिग्विजय राठोड, उपनिबंधक (9850095677) 

पुणे शहर (क्रमांक एक) च्या हद्दीतील 
गृहनिर्माण संस्था : 
तीन हजार 367 
सुविधेचा लाभ घेतलेल्या सोसायट्यांची संख्या : 237 
खरेदी केलेल्या सभासदांची संख्या : 26 हजार 451 
गेल्या आठवडाभरात भाजीपाला विक्री : 
307 क्विंटल 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: सोन्याच्या भावात घसरण कायम! 10 दिवसांत 15 हजारांनी सोनं स्वस्त; पाहा महाराष्ट्रातील आजचे ताजे दर

Pandharpur Chaitra Ekadashi : लाखो भाविकांसाठी महत्त्वाची बातमी! पंढरपुरात 'या' तारखेपर्यंत VIP दर्शन पूर्णपणे बंद; विठ्ठलाच्या दर्शनापूर्वी हा नियम जाणून घ्या

Latest Marathi News Live Update : मुंबईसह ७ राज्यांमध्ये बॉम्बस्फोट करण्याचा कट, ९ दहशतवाद्यांना अटक

Iran Missile Attack Near India : युद्धाची धग भारतापर्यंत, इराणचा हिंद महासागरातल्या बेटावर क्षेपणास्त्र हल्ला

Multibagger Stock: 17 रुपायांवरून 1166 रुपयांपर्यंत झेप! 3 वर्षांत 6600% रिटर्न; बाजार कोसळत असतानाही हा शेअर तेजीत

SCROLL FOR NEXT