पुणे

कास - बेदरकारपणे गाडी चालवून वाहनांचे नुकसान केल्याप्रकरणी एकावर गुन्हा...

CD

वाहनांच्या नुकसानप्रकरणी
चारचाकी चालकावर गुन्हा

कास, ता. २७ ः सातारा- मेढा- महाबळेश्वर रस्त्यावर मेढा गावच्या हद्दीत बेदरकारपणे वाहन चालवून दोन वाहनांचे नुकसान केल्याप्रकरणी एकावर मेढा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल झाली आहे. उत्कर्ष रवींद्र कुंभार (वय २३, रा. कुंभारवाडा, मेढा) यांनी पोलिसांत तक्रार दिली असून, जगन्नाथ प्रल्हाद थोरात (रा. चिलाईदेवी मंदिरानजीक, कालवडे, ता. कऱ्हाड) याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.
मेढा पोलिसांनी दिलेली माहिती अशी, २५ फेब्रुवारीला १० वाजण्याच्या सुमारास मेढा गावच्या हद्दीत महाबळेश्वर ते सातारा जाणाऱ्या रस्त्यावर एसटी स्टँडच्या जवळ असणाऱ्या अद्वैत कॅफेसमोर तक्रारदार यांच्या मालकीच्या चारचाकी (एमएच ११ बीएल ४२३१) उभी असताना जगन्नाथ थोरात याने आपल्या ताब्यातील चारचाकी (एमएच ५० ए ६२३६) महाबळेवर ते सातारा अशी चालवत असताना तक्रारदार यांच्या चारचाकीला पाठीमागून जोराची धडक दिली. यामध्ये त्यांच्या चारचाकीपुढे उभ्या असलेल्या दुसऱ्या चारचाकीला (एमएच ११ सीक्यू ९२२९) धडक लागून स्वतः चालक गंभीर जखमी झाला, तर दोन्ही वाहनांचे सुमारे ८० हजार रुपयांचे नुकसान केले. तपास हवालदार यादव व माने करत आहेत.

--------------------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Fire News: पुण्यात मुळा-मुठा नदीपात्रातील कचऱ्याला भीषण आग; अग्निशमन दलाचे शर्थीचे प्रयत्न, परिसरात धुराचे मोठे लोट

Latest Marathi News Live Update : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाहनांचा ताफा अडविण्याचा प्रयत्न

Horoscope : मार्चच्या पहिल्याच आठवड्यात 4 राशींचा गोल्डन टाईम सुरु ! अचानक धनलाभ आणि करिअरमध्ये यश

Mumbai Local: लोकलचे वेळापत्रक कोलमडणार! अनेक गाड्या रद्द होणार; पण कधी? रेल्वे प्रशासनाची महत्त्वाची माहिती

IPL 2026 Date Change : इंडियन प्रीमिअर लीग २६ मार्च ऐवजी 'या' तारखेला सुरू होणार; जाणून घ्या त्यामागचं महत्त्वाचं कारण...

SCROLL FOR NEXT