पुणे

वाहनवाढीचा वेग सुसाट

योगिराज प्रभुणे

पुणे - स्वतःच्या वाहनांशिवाय घराबाहेर न पडण्याच्या आपल्या सवयीमुळे शहरातील वाहनवाढीचा वेग आता इतका सुसाट झाला आहे, की पुण्याने मुंबई, दिल्ली, बंगळूर, हैदराबाद, चेन्नई आणि कोलकाता या मेगासिटींनाही मागे टाकले आहे. वाहनवाढीत देशात कोची अव्वल असून, त्या खालोखाल पुण्याचा क्रमांक लागला आहे. सध्या आपल्याला भेडसावणारी वाहतूक कोंडी आणि प्रदूषण ही समस्या यातून निर्माण झाली आहे.

‘सेंटर फॉर सायन्स अँड एन्व्हायर्न्मेंट’तर्फे (सीएसई) देशातील १४ प्रमुख शहरांमध्ये गेल्या अकरा वर्षांमध्ये वाढलेल्या वाहनांच्या वाढीचे विश्‍लेषण करण्यात आले. त्यात मुंबई, दिल्ली, बंगळूर, हैदराबाद, चेन्नई आणि कोलकाता या मेगासिटी आणि पुण्यासह चंडीगड, जयपूर, अहमदाबाद, भोपाळ, कोची, लखनौ, विजयवाडा या मेट्रोसिटीचा समावेश आहे. त्याच्या विश्‍लेषणातून हा निष्कर्ष निघाला आहे. मेगासिटीमध्ये गेल्या साठ वर्षांमध्ये मोठ्या प्रमाणात वाहन खरेदी झाली. मात्र गेल्या दहा वर्षांमध्ये बस, मेट्रो, बीआरटी, लोकल असे वेगवेगळे प्रयोग करत सार्वजनिक वाहतूक सक्षम करण्यात आली. त्यामुळे तेथील रस्त्यांवर नव्याने येणाऱ्या वाहनांचे प्रमाण कमी झाले. मेट्रोसिटीमध्ये मात्र वार्षिक सरासरी वाहन नोंदणीचा दर सातत्याने वाढत असल्याचेही या अभ्यासातून अधोरेखित करण्यात आले आहे.

पुण्यात दुचाकींची नोंदणी सर्वाधिक
देशात २०१६ मध्ये सर्वांत कमी वाहनांची नोंदणी मुंबईत झाली. देशाच्या आर्थिक राजधानीतील नागरिक खासगी वाहनाला प्राधान्य देत नाहीत. पण याच वर्षी पुण्याचा वाहन नोंदणीत चौदा शहरांमध्ये सहावा क्रमांक लागला. पुण्यात या दरम्यान चारचाकींपेक्षा दुचाकींची नोंदणी मोठ्या प्रमाणात झाली. सर्वाधिक वाहन नोंदणी चंडीगड येथे झाल्याचे ‘सीएसई’ने नमूद केले आहे. 

भविष्यातील धोक्‍याची घंटा
देशातील मेट्रोसिटींमधील वेगाने वाढणारा वाहन नोंदणीचा वार्षिक सरासरी दर ही भविष्यातील धोक्‍याची घंटा आहे. भविष्यात या शहरांमध्ये निर्माण होणाऱ्या समस्यांचा हा एक मापदंड आहे. यातून शहरांमधील समस्यांमध्ये भर पडणार आहे. 

दृष्टिक्षेपात पुण्यातील वाहन
मार्च २०१८ पर्यंत पुण्यात नोंद झालेल्या वाहनांची संख्या ः ३६ लाख २७ हजार २८०
दुचाकींची संख्या - २७ लाख तीन हजार १४७
चारचाकी वाहनांची संख्या - ६ लाख ४५ हजार ६८३
इतर वाहने - दोन लाख ७८ हजार ४५०
(स्रोत - पुणे महापालिका पर्यावरण अहवाल २०१७-१८)

पुण्याचा दर १८ टक्के
देशात २००६ ते २०१६ दरम्यान मेगासिटीमध्ये वाहन नोंदणीचा वार्षिक सरासरी दर १५ टक्के आहे. तर देशाची राजधानी असलेल्या दिल्लीचा हा दर ११.१ टक्के आहे. पुण्याचा मात्र हा दर १८ टक्के असून, कोची २६.५ टक्के आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Karad News : महाराष्ट्र केसरी स्पर्धेसंदर्भात महाराष्ट्रातील पैलवानांना क्रीडामंत्र्यांचा शब्द, म्हणाले....

Mohol News : भाजपचे मुस्लिम समाजाला 'रमजान'चे गिफ्ट; पंचायत समितीच्या सभापतीपदी भाजपचे अस्लम चौधरी, उल्का पाटील उपसभापती

Mojtaba Khamenei: ''प्रत्येक मृत्यूचा बदला घेऊ'', इराणच्या सर्वोच्च नेत्याने दिला पहिलाच इशारा; म्हणाले...

Nilanga Fire : निलंगा बस डेपोत डिझेल भरताना पंपाला लागली आग; तेल भरणारा वाहन परिक्षक भाजला, बसही पेटली

Leopard Attack: बिबट्यांना मारणे गुन्हा राहणार नाही; अनुसूची बदलण्यास मंजुरी, वाढत्या हल्ल्यांवर महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT