petrol and diesel sakal
पुणे

पेट्रोल व डिझेल टंचाईमुळे वाहनधारक, शेतकरी हतबल

पेट्रोल व डिझेल टंचाईमुळे आज नारायणगाव परिसरातील पेट्रोल पंप बंद ठेवण्यात आले.

रवींद्र पाटे

पेट्रोल व डिझेल टंचाईमुळे आज नारायणगाव परिसरातील पेट्रोल पंप बंद ठेवण्यात आले.

नारायणगाव - पेट्रोल व डिझेल टंचाईमुळे आज नारायणगाव परिसरातील पेट्रोल पंप बंद ठेवण्यात आले. यामुळे वाहनधारक नागरिकांची मोठी गैरसोय झाली. पेट्रोल व डिझेल टंचाईचा फटका शेतकरी व भाजीपाला वाहतूकदार, व्यापारी यांना मोठया प्रमाणात बसला.

नारायणगाव परिसरात येथील महामार्गावर रिलायन्स, हिंदुस्थान, भारत पेट्रोलियमचे तीन पेट्रोल पंप आहेत. सोमवारी मध्यरात्री पासून येथील पंपावर पेट्रोल व डिझेल शिल्लक नसल्याचे फलक लावण्यात आले. आज (ता. २४) दिवसभर पेट्रोल व डिझेलचे पंप बंद होते. नारायणगाव ही मोठी बाजारपेठ आहे. जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या येथील उपबजारात रोज सुमारे तीनशे जड वाहने शेतमाल घेऊन ये जा करत असतात. येथील शेतमाल विक्रीसाठी प्रामुख्याने मुंबई बाजारपेठेत जात असतो. डिझेल व पेट्रोल नसल्यामुळे वाहनचालक शेजारच्या तालुक्यात पेट्रोल व डिझेलचा शोध घेत होते. डिझेल व पेट्रोल टंचाईमुळे आज वाहनचालक हवालदिल झाले होते.

राजश्री बोरकर (संचालिका - शेवंताई पेट्रोलियम) - आमच्याकडे भारत पेट्रोलियमची एजन्सी आहे.आम्हाला मनमाड येथील कंपनीच्या डेपोतुन पेट्रोल व डिझेलचा पुरवठा होतो. भाव कमी झाल्यामुळे पेट्रोल व डिझेल पुरवठ्यावर परिणाम झाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange: एकनाथ शिंदेंच्या मागे कोणता डाव? जरांगेंचा पुन्हा गौप्यस्फोट; हातात काय लागलं? कदमांच्या एका वक्तव्याने नवा संशय!

BEST Bus Employees: बेस्ट कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड होणार? बोनसबाबत लवकरच निर्णय घेण्यात येणार

India Economic Growth: भारताची विकासगाथा प्रभावी; रायशे यांचे प्रतिपादन; द्विपक्षीय सहकार्यावरही भर

Marathi News Live Updates: छत्रपती संभाजीनगर पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत आमदार सुरेश धस यांचे कुटुंबासह मतदान

'मी आधी सुप्रियाच्या कामाच्या प्रेमात पडलो मग तिच्या' बायकोबद्दल बोलताना सचिन पिळगांवकर म्हणाले...'ती माझ्यापेक्षा खूप...'

SCROLL FOR NEXT