Crime News esakal
पुणे

Pune Crime : पुण्यात वाहनांची तोडफोड सत्र सुरूच, पाच जणांना अटक

दोन टोळक्यांनी जुन्या वादातून दहशत माजवत वाहनांची तोडफोड केल्याची घटना कात्रज येथील भिलारेवाडी परिसरात घडली.

सकाळ वृत्तसेवा

पुणे - दोन टोळक्यांनी जुन्या वादातून दहशत माजवत वाहनांची तोडफोड केल्याची घटना कात्रज येथील भिलारेवाडी परिसरात घडली. दरम्यान, तोडफोड करणाऱ्या एका टोळक्यातील पाचजणांना भारती विद्यापीठ पोलिसांनी अटक केली आहे.

या प्रकरणी भीमाजी भिकाजी सावंत (वय ३३, रा. भिलारेवाडी, कात्रज) यांनी फिर्याद दिली आहे. त्यावरून भारती विद्यापीठ पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. मधुकर ऊर्फ अप्पा ग्यानबा भिलारे (वय ४७), आकाश नानासाहेब गरबडे (वय २७), अमित उत्तम भिलारे (वय ३६), फिरोज हसन शेख (वय २४), मुस्तफा मेहबूब शेख (वय २१, सर्वजण रा. भिलारेवाडी, कात्रज) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भीमाजी सावंत यांचा आरोपींशी वाद झाला होता. आरोपी भिलारे, गरवडे, शेख आणि त्यांचे साथीदार शनिवारी रात्री ओम साई निवास सोसायटीच्या पार्किंगमध्ये आले. त्यांनी शिवीगाळ करीत हत्यारे आणि बेसबॉल स्टीकने दोन मोटारी, रिक्षा, दोन दुचाकी आणि टँकरवर दगडफेक करून वाहनांची तोडफोड केली.

तर, त्याचदिवशी अन्य एका घटनेत भिलारेवाडी येथील आविष्कार भिलारे यांच्या घराच्या पार्किंगमध्ये एका टोळक्याने हत्यारे हवेत फिरवत दुचाकींची तोडफोड केली. याबाबत आकाश गरबडे (वय २७, रा. अंजलीनगर, कात्रज) यांनी फिर्याद दिली आहे. त्यावरून चारजणांविरुध्द भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

धनकवडी, विश्रांतवाडीतही तोडफोड -

धनकवडी परिसरात रविवारी सायंकाळी गुंड टोळक्याने वाहनांच्या काचा फोडल्या. याबाबत पोलिस कर्मचारी रवी पाईकराव यांनी सहकारनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. तसेच, अन्य एका टोळक्याने विश्रांतवाडी येथील शांतिनगर परिसरात दहशत माजवून दोन दुचाकी आणि रिक्षाच्या काचा फोडल्या. याबाबत विश्रांतवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs AFG: १५ वर्षांच्या वैभव सूर्यंवशीसमोर बुमराहचा यॉर्कर अन् बाऊन्सरचा मारा! सरावावेळी नेमकं काय घडलं?

Civic Body Clash: स्वच्छता साहित्य डीबीटीने देणे अशक्य; महापालिका प्रशासनाचा फेरप्रस्ताव, स्थायी समितीशी संघर्षाची शक्यता

नितीन गडकरींना मुंबईतील वाहतूक कोंडीचा फटका; नियोजित कार्यक्रमात पोहोचण्यास तासभर उशीर; म्हणाले, जुन्या उड्डाणपुलांऐवजी...

ENG vs PAK, Test: इंग्लंडचा पाकिस्तानला व्हाईटवॉश! बर्मिंगहॅम कसोटीतील विजयानंतर WTC Points Table मध्येही मोठे बदल

Youth Sena Leader Car Crash: युवासेना पदाधिकाऱ्याच्या थारची दुचाकीला धडक; कामगार गंभीर जखमी, खर्च न दिल्याचा आरोप करत गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT