वेल्हे, ता. २८ : धानेप येथील धनगर वस्ती (ता. राजगड) येथे शुक्रवारी (ता.२४) चार भावांची घरे भीषण आगीत जळून खाक झाल्याची दुर्दैवी घटना घडल्यानंतर घटनेचे गांभीर्य ओळखून प्रशासन व लोकप्रतिनिधींनी या ठिकाणी प्रत्यक्ष पाहणी करत जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करत संबंधित कुटुंबांना घरकुल योजनेअंतर्गत घरे उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले.
यावेळी पुणे जिल्हा परिषदेचे कृषी व पशुसंवर्धन सभापती अमोल नलावडे ,गटविकास अधिकारी संजय ढमाळ, राजगड तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष किरण राऊत, पोलीस पाटील राहुल मळेकर, संतोष डांगे, ग्रामसेवक तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. धानेप येथील जळीतग्रस्त कुटुंबांना तातडीच्या मदतीची गरज असून, समाजातील दानशूर व्यक्ती, संस्था व नागरिकांनी पुढाकार घेऊन आर्थिक मदत, किराणा साहित्य, कपडे व इतर जीवनावश्यक वस्तू स्वरूपात सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात येत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.