पुणे

घरफोडी, चोरीप्रकरणातील सराईत गुन्हेगारास अटक

CD

वेल्हे, ता. १६ : वेल्हे (ता.राजगड) पोलिसांनी घरफोडी व चोरीच्या गुन्ह्याचा तपास करत सराईत चोरट्यास गुरुवारी (ता. १३) अटक केली. त्याच्याकडून सुमारे साडेतीन लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता असल्याची माहिती शनिवारी (ता.१५) वेल्हे पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी किशोर शेवते यांनी दिली.
रमेश बबन मरगळे (वय २२, मूळ गाव शिरकोली. सध्या राहणारा वेल्हे (ता. राजगड) यास अटक केली असून
आरोपीस न्यायालयात हजर केले असता सोमवारपर्यंत (ता.१७) पोलिस कोठडी देण्यात आली आहे.
वेल्हे पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एका फार्महाऊसच्या बांधकामासाठी आणलेले सुमारे ८८ हजार रुपयांचे साहित्य ९ ऑगस्ट रोजी चोरीला गेले होते. याप्रकरणी वेल्हे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता.
तपासादरम्यान पोलिसांना संशयित चोरटे पुन्हा चोरीच्या उद्देशाने गावात येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिस पथकाने गस्त वाढविली. संशयास्पदरीत्या फिरणारा पिकअप टेम्पो पोलिसांनी अडविण्याचा प्रयत्न केला असता चालकाने वाहन न थांबविता पळ काढला. पोलिसांनी नागरिकांच्या मदतीने टेम्पो अडविला. यावेळी दोघे जण पळून गेले; मात्र चालक रमेश बबन मरगळे याला ताब्यात घेण्यात आले.
मरगळे याला न्यायालयासमोर हजर केले असता पोलिस कोठडी मंजूर करण्यात आली. या कारवाईत प्रभारी अधिकारी किशोर शेवते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक अमित देशमुख, पोलीस हवालदार गजानन खत्री, गोपनीय विभागाचे आकाश पाटील, सोमेश राऊत, युवराज सोमवंशी, बुद्धिवान मोरे, अजिंक्य बंडगर, आकाश पाटील, मयूर जगताप, शुभम कदम व सोमनाथ जाधव यांच्या पथकाने सहभाग घेतला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nashik Bird Election 2026 : नाशिकच्या सिंहासनावर कोण बसलं; कावळा की गिधाड? चुरशीच्या मतदानानंतर अखेर निकाल समोर!

पेट्रोल-डिझेलचा तुटवडा भासण्याची शक्यता; 'या' देशाने जाहीर केली ‘फ्यूल सप्लाय इमर्जन्सी’

Marathi News Live Updates : एमडी ड्रग्ज प्रकरणातील फरार आरोपीला अटक

Shoaib Akhtar: 'आम्ही सॅंडपेपर नाही, बाटलीची झाकणं वापरायचो'; शोएब अख्तरने बॉल टॅम्परिंग वादावर काय म्हटलं?

Ajay-Atul Bandhu Song : पडद्यावर दोन सख्खे भाऊ, अन् आवाजही सख्ख्या भावांचाच! 'बंधू' चित्रपटात अजय-अतुलच्या सुरेल गीताने जिंकली रसिकांची मने

SCROLL FOR NEXT