पुणे

सोंडे हिरोजी परिसरात घरांची पडझड

CD

वेल्हे, ता. १६ : राजगड तालुक्याच्या पूर्व भागातील सोंडे हिरोजी परिसरात शनिवारी (ता. १६) सायंकाळी झालेल्या वादळी पावसामुळे सहा घरांचे मोठे नुकसान झाले. तहसीलदार निवास ढाणे यांनी तातडीने नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश तलाठी व मंडलाधिकारी यांना दिले आहेत.

शनिवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास आंबवणे, करंजावणे, सोंडे हिरोजी आणि सोंडे सरपाले या गावांना वादळी वाऱ्याचा फटका बसला. सोंडे हिरोजी येथील रंगुबाई सरपाले यांच्या घराचे छप्पर उडून भिंती कोसळल्या, तर उज्ज्वला जाधव यांच्या घरावरील पत्र्याची शेड उडाली. विलास शिंदे आणि यशवंत सरपाले यांच्या घरांसह शेळीपालन शेडचेही नुकसान झाले. अश्विनी सरपाले यांच्या घरासमोरील झाड पडल्याने विद्युत तारा तुटून वीजपुरवठा खंडित झाला.

परिसरात अनेक ठिकाणी झाडे कोसळल्याची माहिती पोलिस पाटील नवनाथ खंडाळकर यांनी दिली. दरम्यान, वेल्हे-नसरापूर रस्त्यावरील कुरंगवडी गिरण (ता. भोर) हद्दीत मोठे झाड पडल्याने अर्धा तास वाहतूक कोंडी झाली होती. सार्वजनिक बांधकाम विभागाचे शाखा अभियंता प्रकाश गाडे यांनी जेसीबीच्या साहाय्याने झाड हटवून रस्ता मोकळा केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Divya Shinde Arrest : बिग बॉस मराठी फेम अभिनेत्रीची पोलीस कोठडीत रवानगी, डॉक्टरसोबत का झालेला वाद?

Virat Kohli Records: विराट कोहलीचा वर्ल्ड रेकॉर्ड; जगात असा पराक्रम कुणी केला नव्हता, गावस्करांच्या विक्रमाशीही बरोबरी

Pune Crime: गणेश विसर्जन मिरवणुकीतील गर्दीत चोरट्यांचा डल्ला; पुण्यात १४ घटनांत ९.७७ लाखांचे दागिने लंपास

Kalyan Kale: ‘राहुल गांधींवर टीका करण्याची फडणवीसांची उंची नाही’; खासदार कल्याण काळेंचा मुख्यमंत्र्यांना पलटवार

Pune News: नव्या घराचे स्वप्न अधुरेच राहिले; बांधकामाला पाणी मारताना कैलास बेनके यांचा विजेच्या धक्क्याने मृत्यू

SCROLL FOR NEXT