Venture Capital Fund of Backward Class Entrepreneurs Ramdas Athavale pune  sakal
पुणे

मागासवर्गीय उद्योजकांसाठी ‘व्हेंचर कॅपिटल फंड’- रामदास आठवले

आता मागणारे हात न होता देणारे हात व्हा. मागासवर्गीय उद्योजकांसाठी देण्यात येणाऱ्या ‘व्हेंचर कॅपिटल फंड’ योजनेसाठी सर्वोतोपरी मदत

सकाळ वृत्तसेवा

पुणे : ‘‘आता मागणारे हात न होता देणारे हात व्हा. मागासवर्गीय उद्योजकांसाठी देण्यात येणाऱ्या ‘व्हेंचर कॅपिटल फंड’ योजनेसाठी सर्वोतोपरी मदत करण्यात येईल,’’ असे आश्वासन केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी दिले. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्टडीज विभाग, २० मार्च फाउंडेशन आणि सावित्रीबाई फुले पुणे शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने ‘आर्थिक समतेचे उद्धिष्ट आणि व्हेंचर कॅपिटल फंड फॉर शेड्युल कास्ट’ ही मागासवर्गातील उद्योगांची परिषद भरविण्यात आली होती.

यावेळी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर, कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार, उपमहापौर सुनीता वाडेकर, व्यवस्थापन परिषद सदस्य राजेश पांडे, प्रसेनजीत फडणवीस, डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्टडीज विभागाचे प्रमुख डॉ. विजय खरे, ‘डिक्की’चे अध्यक्ष मिलिंद कांबळे, २० मार्च फाऊंडेशनचे संस्थापक संचालक अविचल धिवार, डॉ. बाबासाहेब आंबेडकर शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष डॉ. सुनिल धिवार आदी मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमात विद्यापीठ अनुदान आयोगाचे माजी अध्यक्ष डॉ. सुखदेव थोरात हे ऑनलाइनद्वारे सहभागी झाले होते. ‘व्हेंचर कॅपिटल फंड फॉर शेड्युल कास्ट’ या योजनेतील त्रुटी दाखवत ही योजना अधिक चांगल्या प्रकारे कशी राबविता येईल, याबाबत धिवार यांनी सादरीकरण केले. ‘‘व्हेंचर कॅपिटल फंडप्रमाणे मागासवर्गीय नवउद्योजकांसाठी स्टार्टअप फंड द्यावा,’’ अशी मागणी कांबळे यांनी यावेळी केली.

‘‘मागासवर्गीय उद्योजकांची संख्या ही त्यांच्या लोकसंख्येच्या तुलनेत अत्यंत कमी आहे. त्यातही घरगुती व लहान स्वरूपातील व्यवसाय अधिक आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर आणि मोठ्या उद्योगात मागासवर्गीयांची संख्या वाढवायची असेल तर त्यांच्या मूळ प्रश्नांवर काम करायची गरज आहे. आजही जातीयवाद हा एक प्रमुख प्रश्न यांच्यासमोर आहे. सरकारने आर्थिक मदत वाढवून या मूळ प्रश्नावर काम करणे गरजेचे आहे.’’

- सुखदेव थोरात, माजी अध्यक्ष, विद्यापीठ अनुदान आयोग व ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Weather : पावसाची पुन्हा एन्ट्री! राज्यातील ८ जिल्ह्यांना येलो अलर्ट; तुमच्या भागात कसे असेल हवामान ?

Cutlet Paratha: एकदा बनवाल तर घरच्यांची फर्माईश ठरलेली! असा बनवा स्वादिष्ट कटलेट पराठा

आजचे राशिभविष्य - 29 सप्टेंबर 2026

US-China Trade Deal : अमेरिका-चीन ट्रेड वॉरला ब्रेक! ६० अब्ज डॉलरच्या व्यापारावर मोठा निर्णय, भारताची चिंता वाढली ?

अस्थिबोध : अवघड शस्त्रक्रिया; पण नियोजन अचूक!

SCROLL FOR NEXT