पुणे

वेताळेश्र्वर महाराजांच्या उत्सवानिमित्त भाविकांची गर्दी

CD

चास, ता. १७ ः खेड तालुक्याच्या पश्चिम पट्यातील शंभो महादेवाच्या पायथ्याशी असलेल्या वेताळेश्र्वर महाराजांचा उत्सव उत्साहात साजरा करण्यात आला.
खेडच्या पश्चिम भागात असलेल्या बिबी, गुंडाळवाडी, बुरसेवाडी येथील ग्रामस्थांचे ग्रामदैवत वेताळेश्र्वर महाराजांचा उत्सव समस्त ग्रामस्थांच्या वतीने साजरा करण्यात आला. सकाळी गावचे माजी सरपंच अरुण आण्णा गुंडाळ, शेतकरी सेनेचे लक्ष्मणराव तनपुरे व इंदुमती तनपुरे, सुनील तनपुरे, गुलाबराव मुके, आरती गुंडाळ, अर्जुन तनपुरे, विष्णुपंत गुंडाळ आदींच्या हस्ते अभिषेक करण्यात आला. त्यानंतर भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती.
उत्सवानिमित्त संगीत भजनाचा कार्यक्रम ग्रामस्थ व यात्रा कमिटीच्या वतीने आयोजित केला होता. या उत्सवानिमित्त राजगुरुनगर नगरपरिषदेचे नगराध्यक्ष मंगेश गुंडाळ, नगरसेविका आशाताई गुंडाळ, सरपंच संगीता तनपुरे, लेखापरीक्षक योगेश तनपुरे, सेवानिवृत्त विशेष लेखा परीक्षक वर्ग १ विजय सावंत यांचा ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला. रात्री बाई मी लाडाची हा लावण्यांचा कार्यक्रम आयोजित केला होता. वेताळेश्र्वर उत्सवासाठी समस्त ग्रामस्थ बिबी, यात्रा कमिटी तसेच राजगुरुनगर, मुंबई, पुणे येथील ग्रामस्थ उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Konkan Project : पोयनार, न्यू मांडवे धरणांना मान्यता; मंत्री कदम, पोयनारला २६५, न्यू मांडवेला १९५ कोटी

Nashik Municipal Corporation : नाशिकच्या २४ खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार! महापालिका अंदाजपत्रकात 'खेडे विकास निधी'ची तरतूद

'यापेक्षा पॉर्न बरं असतं' नोरा फतेहीच्या गाण्यावर भडकले नेटकरी, म्हणाले...'शब्द असे की...'

"काहीही झालं तरीही व्यायाम चुकवत नाही" कमळीच्या 68 वर्षांच्या आजीचं थक्क करणारं फिटनेस रुटीन

Latest Marathi News Live Update : कोल्हापूर जिल्हा परिषदेत अध्यक्ष-उपाध्यक्ष पदांची बिनविरोध निवड

SCROLL FOR NEXT