tanuja-birthday
tanuja-birthday 
पुणे

'मनामध्ये हवी जगण्याची ऊर्मी'

सकाळ वृत्तसेवा

पुणे -  ‘‘वय मोजत जगलो तर जगणंच विसरून जाल. माझ्यासाठी कधीच वयाची मर्यादा महत्त्वाची नव्हती, ना आता आहे. मी माझ्याप्रमाणे जगत राहणार. मनात जगण्याची ऊर्मी आणि उत्सुकता असावी लागते. ती मनातून येते आणि सांगते, की ‘हो, मला जगायचंय,’’ अशी भावना ज्येष्ठ अभिनेत्री तनुजा यांनी मंगळवारी त्यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त व्यक्त केली.

राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय (एनएफएआय) आणि फेडरेशन ऑफ फिल्म सोसायटीज ऑफ इंडियातर्फे आयोजिलेल्या १४ व्या चित्रपट रसास्वाद शिबिराचा समारोप झाला. तनुजा यांच्या वाढदिवसानिमित्त ‘एनएफएआय’चे संचालक प्रकाश मगदूम यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. या प्रसंगी अभिनेत्री तनिशा मुखर्जी, अभिनेते नितीश भारद्वाज आणि सतीश जकातदार उपस्थित होते. शिबिरात सहभाग घेतलेल्या व्यक्तींना या कार्यक्रमात प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. 

तनुजा यांचा चित्रपट प्रवास मांडणारी योगी चौबळ यांनी तयार केलेली चित्रफीत आणि तनुजा यांची भूमिका असलेला ‘पितृऋण’ हा चित्रपट या वेळी दाखविण्यात आला. त्याशिवाय, तनुजा यांनी ‘छबीला’ या त्यांच्या चित्रपटातील एका छायाचित्रासह त्यांच्या व्यक्तिगत संग्रहातील त्यांचे कुटुंबीय आणि मित्र परिवारासमवेतची काही छायाचित्रेही ‘एनएफएआय’ला भेट दिली.

तनुजा म्हणाल्या, ‘‘चित्रपटांकडे मी माझ्या नजरेने पाहते. मला चित्रपटांबद्दल कधी मत मांडायला आवडत नाही. हा चित्रपट वाईट की चांगला हे मी कधीच म्हणत नाही. चित्रपट हे केवळ पैसे कमावण्यासाठी बनत नाहीत; तर मनापासून आपला दृष्टिकोन दाखवण्यासाठीही बनवतात. आपल्याला चित्रपट नाही आवडले तर तो आपला विचार आहे. दिग्दर्शक मेहनत करून मनापासून चित्रपट बनवतात. त्यांचे चित्रपट चांगले की वाईट, हा बोलण्याचा आपल्याला अधिकार नाही.’’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MI vs KKR : शाहरूख... वानखेडे... केकेआर! अखेर 12 वर्षानंतर संपला विजयाचा दुष्काळ

MSC Aries Ship : इराणने जप्त केलेल्या कार्गो शिपमधील क्रू मेंबर्सची सुटका; 16 भारतीयांचा समावेश

RCB vs GT : गुजरातला प्ले ऑफसाठी विजय गरजेचा, आरसीबी टाकणार का मिठाचा खडा

PM Modi : ''हिंदूंना दुसऱ्या दर्जाचे नागरिक करण्याचा डाव'', पंतप्रधान मोदींची तृणमूल काँग्रेसवर टीका

MI vs KKR IPL 2024 : सूर्यकुमार लढला मात्र केकेआरनं एका तपानंतर वानखेडेवर विजय केला साजरा

SCROLL FOR NEXT