पुणे

'ज्ञानप्रबोधिनीने मार्गदर्शन करावे'

सकाळ वृत्तसेवा

पुणे - केंद्र शासनाने नुकतेच राष्ट्रीय शैक्षणिक धोरण जाहीर केले आहे. यातील अनेक गोष्टी ज्ञानप्रबोधिनी गेल्या पन्नास वर्षांपासून करीत आली आहे. ही संस्था देशाच्या पुढे आहे, हे सर्वांना कळण्यासाठी शिक्षण क्षेत्रात ज्ञानप्रबोधिनीने देशाला मार्गदर्शन करावे, असे गौरवोद्गार ज्ञानप्रबोधिनीचे अध्यक्ष ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांनी काढले.

ज्ञानप्रबोधिनी प्रशालेच्या सुवर्ण महोत्सवाच्या आरंभ प्रसंगी ते बोलत होते. या वेळी ज्ञानप्रबोधिनीच्या टपाल पाकिटाचे प्रकाशन पोस्ट मास्तर जनरल सैयद फाजिल हुसेन रिझवी यांच्या हस्ते, तर प्रशालेच्या संकेतस्थळाचे व पोर्टलचे प्रकाशन प्राज इंडस्ट्रीचे अध्यक्ष प्रमोद चौधरी यांनी केले. संस्थेचे संचालक गिरीश बापट, रवी पंडीत उपस्थित होते.

डॉ. माशेलकर म्हणाले, ‘‘देशाचे रूप पालटण्याचा ध्यास अप्पा पेंडसे यांनी घेतला होता. हे उद्दिष्ट शिक्षणातूनच साध्य होऊ शकते, यावर त्यांचा विश्‍वास होता. बुद्धी, ज्ञान, क्षमता, मूल्य, वृत्ती, मूल्ये, व्यक्‍ती आणि नेतृत्वाचे संवर्धन ही सप्तपदी अप्पांनी दिली आहे. जग झपाट्याने बदलत असल्याने अप्पांच्या या मूल्याधिष्ठित शिक्षणव्यवस्थेला तंत्रज्ञानाची जोड आवश्‍यक आहे. पदवी घेतली म्हणजे शिक्षण संपले, असे नाही. शेवटपर्यंत सरस्वतीची उपासना करावी लागेल; अन्यथा आपण मागे पडू.’’

स्थापनेपासूनचे प्राचार्य एकाच व्यासपीठावर
ज्ञानप्रबोधिनीला ५० वर्षे पूर्ण होत असताना संस्थेच्या स्थापनेच्या वेळचे प्राचार्य यशवंत लेले यांच्यानंतर वामनराव अभ्यंकर, युवती प्रशालेच्या नलिनी गुजराथी व आताचे प्राचार्य मिलिंद नाईक हे एकाच वेळी व्यासपीठावर उपस्थित होते. स्थापनेपासून ते आतापर्यंतची ज्ञानप्रबोधिनी कशी घडली, हे त्यांनी उलगडून सांगितले. त्याला उपस्थितांनी दाद दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vijay Wadettiwar : हेमंत करकरे प्रकरणात वडेट्टीवारांनी दिला 'या' पुस्तकाचा दाखला; उज्ज्वल निकम यांच्यावरही गंभीर आरोप

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

IPL 2024 LSG vs KKR Live Score: रमनदीपने अर्शिन कुलकर्णीचा घेतला अफलातून कॅच! स्टार्कला मिळाली पहिली विकेट

Vijay Wadettiwar : ''हेमंत करकरेंची हत्या पोलिसांकडून'', विजय वडेट्टीवारांचा आरोप अन् फडणवीसांचा पलटवार

IPL 2024: हर्षल तुला निवृत्तीच्या दिवसात CSKचं काँट्रॅक्ट मिळणार नाही! धोनीला शुन्यावर बाद करणारा गोलंदाज होतोय ट्रोल

SCROLL FOR NEXT